Arondol

एरंडोल न.पा.चे पाणीपुरवठा विभागातील कर्तव्यदक्ष कर्मचारी ज्यांनी कोरोना काळात जिवाची तमा न बाळगता प्रामाणिकपणे सेवा समर्पित केली असे कोरोनायोद्धा स्व.वना धोंडू महाजन यांच्या वारसास चि.भरत वना महाजन यांना अनुकंपा तत्वावर पा.पु.मजूर वर्ग ४ या रिक्त पदावर नियुक्त करून सेवेत सामावून घेण्यात आले…

एरंडोल : आज रोजी एरंडोल न.पा.चे पाणीपुरवठा विभागातील कर्तव्यदक्ष कर्मचारी ज्यांनी कोरोना काळात जिवाची तमा न बाळगता प्रामाणिकपणे सेवा समर्पित केली असे कोरोनायोद्धा स्व.वना धोंडू महाजन यांच्या वारसास चि.भरत वना महाजन यांना अनुकंपा तत्वावर पा.पु.मजूर वर्ग ४ या रिक्त पदावर नियुक्त करून सेवेत सामावून घेण्यात आले…

भरत महाजन यांना नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी व मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नगरसेवक कुणाल महाजन,नगरसेवक योगेश महाजन, युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ, पाणीपुरवठा विभागप्रमुख प्रियंका जैन, भिका महाजन, हिम्मत महाजन आदी उपस्थित होते.

*स्व.वना धोंडू महाजन* हे पाणी पुरवठा विभागातील एक कर्तव्यदक्ष ,कामावर प्रामाणिक निष्ठा असलेले कर्मचारी होते. कोरोना काळात कोणतीही सबब न सांगता त्यांनी दिवसरात्र सेवा दिली. त्यातच त्यांना कोरोनाचा संसर्ग होवून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तात्काळ त्यांच्या वारसाला अनुकंपा तत्वावर सामावून घेण्यासाठी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी व सर्व सन्माननीय नगरसेवकांनी न.पा.च्या विशेष सभेत सर्वसंमतीने ठराव मंजूर केला. याकामी मुख्याधिकारी किरण देशमुख व कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ यांनी शासन स्तरावर जलदगतीने पाठपुरावा करून सहकार्य केले. स्व.वना धोंडू महाजन यांच्या वारसाला सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयाचे सर्व कर्मचारी वर्गाने स्वागत केले….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button