Jalgaon

जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.बाळसाहेब प्रदीप पवार यांच्या भूमिकेमुळे महा विकास आघाडीला घवघवीत यश

जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.बाळसाहेब प्रदीप पवार यांच्या भूमिकेमुळे महा विकास आघाडीला घवघवीत यश

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सुरुवातीला सर्वपक्षीय उच्चस्तरीय वाटाघाटी नुसार, काँग्रेस पक्षाला दोन जागा देण्याचे ठरले होते. परंतु त्यात भाजपचाही समावेश असल्याने, जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री बाळासाहेब प्रदीप पवार यांनी नविन जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्याबरोबर भाजप बरोबर निवडणुकीत सहभाग घेण्यास नकार दिला. व तोच बँकेच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी कांग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्या वक्तव्यावर एकमत झाले तोच “टर्निंग पॉईंट” ठरला. त्यानंतर बँकेत सर्वपक्षीय उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. मात्र भाजपची दाणादाण उडाली. व महाविकासआघाडी ला दोष देत भाजपने बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला. बहिष्काराची कारण मतदारांच्या चाचपणी अंती, व आजचे महागाई व बेरोजगारीची परिस्थिती पाहता, मतदार भाजपपासून दुरावला आहे. अशी अनेक कारणे असू शकतील परंतु टर्निंग पॉईंट मात्र काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या भूमिकेने च झाला. हे सत्य दुर्लक्षून चालणार नाही. त्यानंतर देखील काही भाजपच्या उमेदवारांनी लढतीसाठी अर्ज ठेवले. काही काँग्रेस उमेदवारांनी बंडखोरी केली. सर्वांनी निवडणूकीचा प्रचारही केला. परंतु मतदारांनी मात्र एक मुखी कौल दिला तो फक्त महा विकास आघाडीलाच. वाटाघाटी नुसार काँग्रेसला चार जागा मिळत होत्या, परंतु माघारी नंतर तांत्रिक कारणामुळे तीनच जागा काँग्रेसला मिळाल्या .निवडणूक निकालानंतर रावेर, यावल, सोसायटी मतदार संघ व चोपडा महिला मतदार संघातून अशा तीन जागांवर काँग्रेसला १०० टक्के यश आले तसेच मागील पंचवार्षिक मध्ये कांग्रेस ला एकच जागा होती आता मा.जिल्हाध्यक्ष यांच्या प्रयत्नातून तीनवर पोहचलो हे श्रेय मा.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीपरावजी पवार यांनाच जाते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मतदार हे विकास सोसायटीतील व इतर संस्थांतील ठराव धारक असतात. ते स्थानिक राजकारणातले अर्क असतात. यावरून असे चित्र स्पष्ट होते की महा विकास आघाडीकडे जनताजनार्दन चा झुकता कल आहे. परंतु यातही समजण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या सर्व घटकपक्षांना न्यायाने, समाधानकारक व सन्मान पूर्वक वागवले पाहिजे. व स्थानिक पातळीवर उमेदवारांना न्याय जागा दिल्या पाहिजेत, अन्यथा प्रत्येक पक्ष आपल्या परीने न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात कलह बोकाळला जाऊ शकतो याची जाणीव महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी व जिल्हाध्यक्ष यांनी ठेवली पाहिजे ही सर्व सामान्य जनतेची व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.जळगाव जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी.सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब डी डी पाटील,अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, सरचिटणीस,भागवत सुर्यवंशी युवक तालुकाध्यक्ष महेश पाटील, युवक कार्याध्यक्ष कुणाल चौधरी यांच्या तर्फे जळगाव जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब प्रदीप पवार व रावेर आमदार दादासाहेब शिरीष चौधरी यांचे हार्दिक अभिनंदन.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button