sawada

नागरिकांना ३ वर्षापासून येणाऱ्या दुप्पट पाणीपट्टी कर सावदा न.पा.सत्ताधाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत!माजी नगरसेवक फिरोजखान पठाण

नागरिकांना ३ वर्षापासून येणाऱ्या दुप्पट पाणीपट्टी कर सावदा न.पा.सत्ताधाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत!माजी नगरसेवक फिरोजखान पठाण

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहराची नवीन हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या क्षेत्रातील नागरिकांना लागोपाठ गेल्या ३ वर्षापासून दुपटीची आकारण्यात येणारी पाणीपट्टीचा भुर्दंड नाहक सहन करावा लागत असून गेल्या डिसेंबर २०२१ मध्ये कार्यकाळ संपुष्टात आलेल्या सत्ताधाऱ्यांचे आडकाठी धोरण व निष्काळजीपणामुळे येथील नागरिकांना हा अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे माजी नगरसेवक फिरोजखान पठाण यांनी सांगितले आहे.

दि.४ नोव्हेंबर २०१९ पासून सावदा नगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या येथील सर्व नवीन भागातील नागरिकांना जे दुपटीची पाणीपट्टी वाढ आर्थिक रित्या नाहक सोसावी लागत असून.यांना नियमाप्रमाणे पालिका हद्दीतील घरगुती पाणीपट्टी १४०० अनुसार न आकारता थेट २९०० रुपये व अमानत रक्कम २९०० रुपये आणि व्यावसाईक पाणीपट्टी ७२०० रुपये अशी जुलमी आकारणी केली जात आहे.तरी ही जास्तीची रक्कम हतबल होऊन नाईलाजाने येथील नागरिकांना पालिकेत तीन वर्षापासून ही दुप्पटीने कराची रक्कम भरावी लागत आहे.

यासर्व प्रकारा बाबत विरोधी गटनेता असतांना माजी नगरसेवक फिरोजखान पठाण यांनी गत दोन वर्षात वेळोवेळी याबाबत पालिकेत निवेदने दिली असता सर्वसामान्य जनतेच्या या समस्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले गेल्याने अद्याप देखील नागरिकांना दुपट पाणीपट्टीचा मोठा भार या गोरगरीबाना सहन करावा लागत आहे.हे मात्र खरे आहे.

तरी सर्वसामान्य नागरिकांची संबंधित सदरील प्रकाराकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक तीन वर्षापूर्वीच पालिकेत ठराव घेतला असता तर नागरिकांना हा जास्तीचा आर्थिक भार पेलावा लागला नसता अशी भूमिका फिरोजखान पठाण यांनी मांडली असून कोरोना सारख्या काळात देखील ज्यावेळी नागरिकांची आर्थिक परिस्थितीत बिकट होती तेव्हा देखील या गोरगरीब नागरिकांनी हा भार पेलला त्यामुळे आतातरी प्रशासक यांनी काही मार्ग काढून नवीन हद्दीबाहेरील नागरिकांची ही दुपटीची पाणीपट्टी नियमानुसार ह्द्दीतीतील पाणीपट्टी प्रमाणे करून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करताना केली. अन्यथा या नागरिकांना त्वरित योग्य न्याय न मिळाल्यास थेट रस्त्यावर उतरून पालिकेसमोर आंदोलन करावे लागल्यास ते देखील करू असा पवित्रा आता फिरोजखान पठाण यांनी घेतला असून यास हद्दीबाहेरील नागेरीकांचा मोठा प्रतिसाद देखील लाभत आहे त्यामुळे ही दुपटीची जुलमी पाणी पाणीपट्टी लवकर पालिकेने कमी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button