Chandwad

चांदवडला कोरोनामुळे रेणुकादेवी मंदिरात नवरात्र शांततेतच

चांदवडला कोरोनामुळे रेणुकादेवी मंदिरात नवरात्र शांततेतच

चांदवड उदय वायकोळे

चांदवड शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत असलेलं रेणुकादेवी मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील अनेक लोकांची कुलदेवी आहे. मुंबई आग्रा महामार्ग वरून जाणाऱ्या येणाऱ्या अनेक भाविकांचे श्रद्धास्थान रेणुकादेवी असून येथील प्रचिती अनेकांना आलेली आहे.महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री अशोक पितांबर भंगाळे हे सुद्धा वर्षातून एकदा देविदर्शनाला येत असतात,महाराष्ट्र विधानपरिषद उपाध्यक्ष सौ निलमताई गोऱ्हे हासुद्धा नवरात्रात एकदा येतात मात्र यावर्षी कोरोना परिस्थितीमुळे कोणासही भाविकांना प्रवेश न देता फक्त आरती करणारे पासधारक यांनाच प्रवेश देण्यात आल्याचे ट्रस्टचे सहायक व्यवस्थापक श्री सुभाष पवार यांनी सांगितले.ठिकठिकाणाहून नैवेद्य घेऊन आल्याचे अनेक लोक आज दिसत होते मात्र मंदिर परिसरात ब्यारिकेट लावून मनमाड पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे ,सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button