Amalner

दुष्काळ Live…शेतकऱ्यांच्या दुष्काळी निवेदनाची जिल्हाधिकारी यांनी घेतली  तात्काळ दखल..जिल्हा कृषी अधिकारी यांनी केला पाहणी दौरा…

शेतकऱ्यांच्या दुष्काळी निवेदनाची जिल्हाधिकारी यांनी घेतली तात्काळ दखल..जिल्हा कृषी अधिकारी यांनी केला पाहणी दौरा…

अमळनेर मारवड मंडळात आज रोजी जिल्हा कृषी अधीक्षक श्री संभाजी ठाकुर व इतरत्र अधिकाऱ्यांनी दुष्काळ परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या कापूस मका ज्वारी बाजरी आदी पिकांची दुबार केलेली लागवड व पेरणी वाया गेल्याने प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या तीन दिवसा पूर्वी मारवड अमळगाव भरवस या तीन मंडळातील शेतकऱ्यांनी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाले असल्याने मा. जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांना निवेदन दिले होते की यावर्षी जून जुलै या दोन महिन्यात दुबार पेरणी व कापूस पिकाची लागवड केली होती मात्र पुरेसा पाऊस नसल्याने उतारा होऊच शकला नाही अशा अनेक ठिकाणी अत्यल्प पाऊस असल्याने गमभिर दुष्काळ परिस्थितीमुळे मुळे शेतकरी हैराण झाला असून आज रोजी आगस्ट महिना लागूनही पाऊस नाही त्यामुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट निर्माण झाले आहे.एवढ्या संकटाला शेतकऱ्याला स्वतः संघर्ष करावा लागत आहे.लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि स्थानिक अधिकाऱ्यांची अनास्था आणि बेजबाबदार पणा यामुळे शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना जावे लागले.तरीही तालुक्याचे लोकप्रतिनिधी बेजबाबदारपणे एवढी भीषण दुष्काळ परिस्थिती असूनही ठोस अशी दखल घेतांना दिसून येत नाहीत.भीषण दुष्काळ परिस्थिती असूनही शेतकरी पुत्र आजही सामना करीत आहेत. गुरांसाठी चारा नाही ,चार ते पाच हजार रुपये प्रति टन ऊस खरेदी करून आणत असून तो चारा गुरांना खाऊ घालावा लागत आहे.

तरी या भीषण दुष्काळग्रस्त मारवड,अमळगाव,भरवस या तिन्ही मंडळानी दिलेल्या निवेदनाची जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन आज रोजी मारवड मंडळात पाहणी साठी जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक ठाकूर, जिल्हा पिकविमा कम्पनी समनव्यक प्रभास, उपविभागीय अधिकारी कृषी दादाराव जाधवराव तसेच अमळनेर तालुका कृषी अधिकारी भारत वारे, मंडळ कृषी अधिकारी श्री प्रदीप निकम, कृषी सहायक योगेश वनजारी,दीपक चौधरी यांनी प्रत्यक्ष शेताची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्या सोबत मारवड परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यावेळी अधिकाऱ्यांना अमळनेर तालुका फ्रुटसेल चे चेअरमन श्यामकांत पाटील,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, मारवड येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी जिजाबराव पाटील, मधुकर पाटील, प्रकाश पाटील, पंकज पाटील, शरद पाटील, अमोल पाटील चमपलाल शिंदे, अनिल पाटील, रुपेश पाटील, दिनेश पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button