Amalner

?️ दिव्यांगांवर कोरोनाचा कहर…शासनाकडून मिळाले फक्त गाजर…

दिव्यांगांवर कोरोनाचा कहर…शासनाकडून मिळाले फक्त गाजर

कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. रोज च्या रोज काम करून तसेच मध्यम वर्गीय कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून याचा जास्त फटका बसला आहे.

अमळनेर शहरात अनेक दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. एकतर दिव्यांग बंधू भगिनी हे स्पेशल असल्या मुळे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे,किंवा आणीबाणीच्या काळात उदरनिर्वाह साठी साधन सामग्री उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. आज तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव हे शासनाच्या विविध योजनांच्या अंबलबजावणी ची डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत.आधीच दिव्यांग बांधवांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते त्यात शासन कोणत्याही प्रकारच्या योजना प्रत्यक्षात अंमलात आणत नसून ह्या कुटुंबातील सदस्यांना उपास मारीची वेळ आली आहे.

लॉकडाऊनच्या आजतागायत लॉकडाऊनचे खरोखर पालन केले असेल तर ते फक्त दिव्यांग बांधवांनी.

शासनाकडून दिव्यांगांसाठी अनेक योजना लागू असतांना संजय गांधी योजना, स्थानिक स्वराज्य संस्था ५% निधी, ग्रामपंचायत ५% निधी , पंचायत समिती निधी, जिल्हा परिषद निधी अश्या योजना आहेत तर कोरोना पार्श्वभूमीवर देखील अनेक घोषणा केल्या गेल्या आहेत परंतु कोणतीही घोषणा अथवा योजनांची अंमलबजावणी होत नसतांना दिव्यांग बांधवांकडून शासनाच्या बाबतीत मात्र नाराजगी व्यक्त होत आहे.

शासनाकडून दिव्यांगांना जी मदत पोहचवणे गरजेचे असतांना देखील शासनाकडुन दिव्यांगांना फक्त गाजर दिले असेच दिव्यांगांच्या बाबतीत म्हटले जात आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने अनेक सुविधा दिल्या आहेत प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत देखील 500 रुपये दिले गेले मग दिव्यांग व्यक्ती या समाजातील घटक नाही का?

अशी प्रतिक्रिया प्रहार दिव्यांग शक्तीचे शहर अध्यक्ष योगेश पवार यांनी दिली आहे.

त्यातच शासनाने संजय गांधी योजनेच्या तीन महिन्याचे अनुदान एकठोक देण्याची घोषणा करून देखील मागील महिन्याचे अनुदान मिळाले नाही यावर दिव्यांग बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button