Maharashtra

पावसाअभावी तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती.. पहा गांधली येथील तरुणांनी काढली जिवंत माणसाची प्रेतयात्रा..!अनोखे आंदोलन..!

पावसाअभावी तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती.. पहा गांधली येथील तरुणांनी काढली जिवंत माणसाची प्रेतयात्रा..!अनोखे आंदोलन..!

अमळनेर तालुक्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण चिंता जनक आहे.आधीच कोरोना त्यात पाऊसच येईना..त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.पावसा अभावी ग्रामीण भागातील शेतकरी, हातमजूर, हतबल झाला आहे.तरुणांना गावातील परिस्थिती ची जाणीव होत असून आज वेगळ्याच माध्यमातून ही स्थिती मांडण्याचा प्रयत्न गांधली येथील तरुणांनी केला आहे. गांधली येथील तरुणांनी व्यंग्यात्मक पद्धतीने , चित्रणातून प्रशासनाला, लोकप्रतिनिधीना दिलेली पूर्वसूचना किंवा इशारा आहे.यात तरुणांनी जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढत जोरदार चपराक प्रशासन आणि लोक प्रतिनिधींना दिली आहे. जी गोष्ट लहान लहान मुलांना,तरुणांना कळू शकते ती परिस्थिती हाता बाहेर गेल्यावर प्रशासनाला आणि लोक प्रतिनिधींना कळेल का? असाच प्रश्न जणू यातून उपस्थित होत आहे.

येणाऱ्या काळात दुष्काळ सदृष्य, संकटाच्या परिस्थितीला, तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. शेतकरी हा हवालदील होऊन आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलू शकतो.या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी दखल घेवून योग्य त्या उपाय योजना करण्यासाठी तत्पर राहावे.असा इशाराच जणू तरुणांनी या माध्यमातून दिला आहे.ह्या अनोख्या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.चला तरुण मंडळी तरी कमीत कमी जागृत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button