Chimur

नेरीत गळफास लावून ड्रॉयव्हरची आत्महत्या

नेरीत गळफास लावून ड्रॉयव्हरची आत्महत्या

ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर

नेरी : चिमुर तालुक्यातील नेरी येथील फुले नगरात कीरायाने राहत असलेल्या ड्रॉयव्हरने घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दि.५ फेब्रुवारीला सकाळी उघडकीस आली .
राजु नारायण ईवनाते रा.कपर्ला वय ३५ वर्षे यांनी सायकांंळी जेवन झाल्यानंतर ४ फेब्रुवारीच्या रात्रोला घरचे सदस्य गहाळ झोपेत असतानी स्वयंपाक खोलीत गळफास लावुन आत्महत्या केली . ५ फेब्रुवारीला घरचे सदस्य सकाळी उठल्यावर गळफास लावुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले . याची माहीती पोलीस वीभागाला देण्यात आली . सोनुले मेजर यांनी पंचनामा करून शव वीच्छेदनासाठी चीमुर उपजील्हा रूग्णालयात शव पाठवीण्यात आले .
तो खाजगी ड्रायव्हर होता तो फुले नगरात किरायाने राहात होता व मुळचा कपर्ला येथील रहिवासी असुन त्याची सासुरवाडी ( नेरी )सरडपारची आहे.
त्याच्या परिवारात पत्नी, दोन चिमुकल्या मुली व एक मुलगा आहे .आत्महत्या चे नेमके कारण काय हे मात्र कळु शकले नाही. पुढील तपास नेरी पोलीस चौकीच्या अधीनस्त आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button