Bollywood

अजय देवगण आणि तब्बू अभिनित दृश्यम २ लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला

अजय देवगण आणि तब्बू अभिनित दृश्यम २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई दृश्यम ह्या हिंदी चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दृश्यम चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि २०१५मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

आधी मल्याळम भाषेत हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१५ मध्ये या चित्रपटाचा हिंदी रिमेक तयार करण्यात आला. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत होते. ह्या चित्रपटाच्या वेगळ्या कथानकामुळे हा चित्रपट सुपरहिट व लोकप्रिय ठरला.

दृश्यम २ चे चित्रीकरण डिसेंबर मध्ये सुरु होईल. दिग्दर्शक अभिषेक पाठक दृश्यम २ दिग्दर्शक आहेत तर अजय देवगण सह तब्बू देखील मुख्य भूमिकेत असेल.काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अजयचा भुज: द प्राइड ऑफ इंडिया ह्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता अजयला पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button