Bollywood

वस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..!पहा काय होत कारण..!

वस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..!पहा काय होत कारण..!

मुंबई दूरदर्शन च्या इतिहासात अनेक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या काही मोजक्या मालिका आहेत.ज्यांनी दूरदर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तर केलीच पण इतिहासात नाव कोरले.यातील एक मालिका म्हणजे बी. आर. चोप्रा यांची महाभारत ही ऐतिहासिक व पौराणिक मालिका… प्रेक्षकांच्या मनात आजही ह्या मालिकेबद्दल प्रेम आणि क्रेझ आहे. 90 च्या दशकातील ह्या मालिकेमुळे दूरदर्शन खऱ्या अर्थाने घरा घरात पोहचले.महाभारतातील प्रत्येक पात्राने केलेला अभिनय हा नितांत सुंदर होता.त्यामुळे प्रत्येक सीन आणि प्रत्येक पात्र जिवंत झाले.आता लॉक डावूनच्या काळात पुन्हा महाभारत दाखविण्यात आले. त्यामुळे काही गोष्टींना पुन्हा उजाळा मिळाला.

महाभारत मालिकेतील द्रौपदी हे पात्र मध्यवर्ती भूमिकेत आणि महत्वपूर्ण होते. जेव्हा वस्त्रहरणाचा सीन शूट होत होता तेव्हा या मालिकेत द्रौपदीच्या भूमिकेत असणाऱ्या रूपा गांगुली देखील रडत होत्या.
रूपा यांनी द्रौपदीचे हे पात्र अत्यन्त उत्कृष्ट पद्धतीने साकारले होते. त्यांना वस्त्रहरणाचा सीन शूट केला जाणार आहे असे सांगितले गेले. यावेळी बी.आर. चोप्रा यांनी रुपा यांना सांगितले की, “जर एखाद्या महिलेला भर सभेत तिचे केस धरून ओढत आणतात आणि तिचे वस्त्रहरण करतात त्यावेळी ती महिला काय विचार करत असेल, ती कोणत्या परिस्थितीतून जात असेल फक्त एवढाच विचार करून हा सीन दे.हे ऐकून रूपा खूप घाबरल्या होत्या. पण रूपा यांनी एकाच टेकमध्ये हा पूर्ण सीन दिला होता. त्यांनी हा सीन इतक्या चांगल्या पद्धतीने दिला की दिग्दर्शकाला एकही टेक घ्यावा लागला नाही. हा सीन पूर्ण झाल्यांनतर रूपा अर्धा तास रडत होत्या. त्यांच्यासाठी हा सीन देणे खूप अवघड होते. एका महिलेच्या त्या भावना प्रेक्षकांसमोर मांडणे खूप अवघड गोष्ट होती. परंतु हिंमतीने त्यांनी हे करून दाखवले. हा सीन करण्यासाठी त्यांनी १५० मीटर लांब असलेली साडी मागवली होती. जेणेकरून एकाच टेकमध्ये हा सीन पूर्ण व्हावा. हा सीन करण्यासाठी रुपा यांना कितीतरी गोल वेढे मारावे लागले होते.त्यामुळे त्यांना चक्कर देखील आली होती.पण एक अत्यन्त अजरामर असा सीन त्यांनी दिला.संपूर्ण कसोटी त्यांनी हात सीन मध्ये लावली होती.आपण फक्त नेहमी एक दृश्य किंवा सिनेमा किंवा मालिका पाहतो पण त्यामागे असंख्य लोकांची मेहनत असते.कलाकार जेंव्हा ही एखादा दृश्य चित्रित करतो तेंव्हा तो स्वतः ला बाजूला ठेवून फक्त त्या भूमिकेचा विचार करतो.त्यामुळेच अश्या भूमिका अजरामर होतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button