Amalner

?️ Big Breaking.. अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचा वाळू माफियांवर दणका शहापूर ता अमळनेर येथे वाळूचे ट्रॅक्टर जप्त..

?️ Big Breaking.. अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचा वाळू माफियांवर दणका शहापूर ता अमळनेर येथे वाळूचे ट्रॅक्टर जप्त..

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर तालुक्यातील शाहपुर येथे 1 ट्रैक्टर पकडण्यात आले आहे.ही कार्यवाही आता संध्याकाळी करण्यात आली असून मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पी एस पाटील मंडळ अधिकारी ,नगाव बु गौरव शिरसाठ तलाठी शाहपुर, पराग पाटील तलाठी अमळगाव, स्वप्निल कुलकर्णी तलाठी गांधली ,संदीप शिंदे तलाठी रनाइचे, प्रकाश महाजन तलाठी अमळगाव यांनी ही कार्यवाही केली आहे.

अमळनेर तालुक्यात वाळू माफियांवर मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी चांगलाच वचक निर्माण केला असून सतत वेगवेगळ्या ठिकाणी वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर, टेंपो,डंपर वर कार्यवाही करण्याचा सपाटा तहसीलदार यांनी सुरू ठेवला आहे. भर पावसात वाळू उपसा करणारे वाळू माफिया बोरी आणि पांझरा नदीच्या परिसरात वाळू उपसा करत आहेत. परंतु मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी आपल्या संपूर्ण पथकासह संपुर्ण परिसरात कार्यवाही चा सपाटा लावला आहे. त्यामुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.तहसीलदार यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button