Faijpur

डॉ प्रमोद नारखेडे हे नामांकित पुरस्काराने सन्मानित

डॉ प्रमोद नारखेडे हे नामांकित पुरस्काराने सन्मानित

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

डॉ प्रमोद भानुदास नारखेडे यांना नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कार्डिओलॉजी कॉन्फरन्स मध्ये एफ एस सी ए आय ( फेलो सोसायटी ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर ऍन्जिओग्राफी अंड इंटर्वेंशनस) आणि एफ आय एस एच ( फेलो ऑफ इंडियन सोसायटी ऑफ हाइपरटेन्शन ) या फेलोशिप पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ प्रमोद नारखेडे हे एक कुशल हृदयरोग तज्ञ असून पुण्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये जसे एन एम वाडिया, जहागीर, रूबी, मणिपाल, सह्याद्री आदी मध्ये रुग्णसेवा देत आहेत.
कोरोनरी एंजियोप्लास्टी पेसमेकर डिव्हाईस इमप्लांटेशन मध्ये डॉ प्रमोद नारखेडे पारंगत व निपुण आहेत. त्यांच्या अहोरात्र भरीव परिश्रमांना पारखत मेडिकल असोसिएशनने त्यांना या प्रख्यात एफ आय एस एच आणि एफ एस सी ए आय फेलोशिप प्रदान केल्या आहेत. डॉ प्रमोद नारखेडे हे श्री भानुदास सुपडू नारखेडे (बुलढाणा ) यांचे जेष्ठ पुत्र आहेत तसेच कै डॉ शांताराम लक्ष्मण बोंडे यांचे जावई आहेत. डॉ प्रमोद नारखेड़े हे मूळ चे बुलढाणा येथील असून धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर मधील प्राणीशास्त्र विभागाच्या प्रा डॉ राजश्री नेमाड़े यांचे भाचे जावाई आहेत….आपल्या यशाचे श्रेय डॉ प्रमोद नारखेड़े आपल्या कुटुंबाला, नातलगांना व मित्र बांधवांना देत आहेत. कार्डियोलॉजी करिअर मधील या यशाचे विशेष श्रेय ते आपल्या प्रेरणास्थान असलेल्या कै डॉ शांताराम बोंडे यांना देतात ते स्वातंत्र्यसैनिक श्री बळीराम तुकाराम नेमाडे यांचे नात जावाई असून समस्त बोंडे व नेमाडे परिवार यांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button