Jalgaon

डॉ .कलाम पुस्तक भिशी प्रणित अभिनव उपक्रमातून कलाशिक्षक, उपक्रमशील शिक्षक चित्रकार सुनिल दाभाडे यांनी दिला वाचन चळवळीला अभिनव संदेश

संविधान सह साहित्य अकादमी पुरस्कृत कोसला व आबाची गोष्ट ग्रंथ पुजनाने गृहप्रवेश

डॉ .कलाम पुस्तक भिशी प्रणित अभिनव उपक्रमातून कलाशिक्षक, उपक्रमशील शिक्षक चित्रकार सुनिल दाभाडे यांनी दिला वाचन चळवळीला अभिनव संदेश

मानवसेवा शाळेचे कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी परंपरेला छेद देत अभिनव पद्धतीने केलेला गृहप्रवेश सोहळा दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी उत्साहात संपन्न झाला.पंचांगानुसार मुहूर्त न शोधता धार्मिक परंपरा झुगारून कुळवाडीभूषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर संविधानासह ग्रंथ पूजन व वृक्षपूजन केले.धार्मिक परंपरांचा अवाजवी सोस न करता जातीय प्रथा नाकारत तसेच बौद्धिक अतिरेक व आर्थिक बडेजाव न करता विवेकी आचार विचारांनी नातेवाईक व इष्ट मित्र मंडळींच्या उपस्थितीत सुनिल दाभाडे यांनी ग्रंथ हेच सर्वकालीन गुरु हा संदेश देत वाचन चळवळ पुरक गृहप्रवेश कार्यक्रम केल्याने या अभिनव गृहप्रवेश सोहळ्याची सर्वत्र सकारात्मक चर्चा होत आहे .
ग्रंथप्रेमी सुनिल दाभाडे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक क्रियाशील सदस्य असल्याने त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथराज अर्थात ‘ संविधान ‘ पुजन निवृत्त शिक्षण उपसंचालक (प्राथमिक ) तथा साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते पुष्प पुजनाने करण्यात आले. स्वर्गीय मातोश्री देवकाबाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई ‘ व मॅक्झिम गॉर्की लिखित ‘ आई ‘ या कादंबरीसह पूज्य विनोबा लिखित ‘ गिताई ‘ व संत तुकडोजी महाराज लिखित ‘ ग्रामगीता ‘, पद्मश्री नरेंद्र दाभोळकर लिखित ‘ लढे अंधश्रद्धेचे ‘ त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचा बहुमान वाढविणारे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त डॉ.भालचंद्र नेमाडे लिखित ‘ कोसला ‘ व तहसीलदार आबा महाजन लिखित ‘आबाच्या गोष्टी ‘ यांच्या पुरस्कृत साहित्याचेही सन्मानपूर्वक पुष्पपूजन केले. प्रारंभी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज,बहिणाबाई चौधरी यांच्या ‘ बहिणाईची गाणी ‘ तसेच अवकाशयात्री सुनिता विल्यम्स चरीत्र लक्षवेधी ठरले.काळया मातीशी असलेली अतूट नाळ असलेल्या निसर्ग कवयित्री बहिणाबाईंचे सर्वोत्तम जीवनचिंतन,भावशास्त्र ते अवकाशात झेप घेणारे सुनिताजींचे आधुनिक तंत्रज्ञान यांचे अद्वैत सुनिल दाभाडेंनी कलात्मकतेने अधोरेखित केल्याने हिंगोणेकर यांनी मार्गदर्शनात ग्रंथप्रेमी सुनिल दाभाडेंचे विशेष कौतूक केले. पुस्तक भिशीतर्फे बुलढाणा येथील सृजनशील ग्रंथपाल तथा वाचन चळवळीचे अर्ध्वव्यू दिवंगत नरेंद्र लांजेवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव जिल्हा प्रमुख विजय लुल्हे मनोगतात म्हणाले की,अपत्य भविष्यात भौतिक साधन संपत्तीवरून वादविवाद करतील परंतू ग्रंथाभिरूची वैचारीक,सांस्कृतिक संस्कार चिरकाल रुजवून कुटूंबाला सदैव एकसंघ व अतूट ठेवेल म्हणून गृहप्रवेशावेळी घरात ग्रंथालय स्थापित करुन वैचारीक संपत्ती सुजाण जन्मदात्यांनी भावी पिढीला देणे हे आद्यकर्तव्य झाले पाहिजे .याप्रसंगी प्रमुख अतिथी निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर ,अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी, कुमुद प्रकाशनाच्या संचालिका सौ.संगीता माळी,सौ.दीक्षा दाभाडे ,ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, काकाश्री न्हानू दाभाडे,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव जिल्हा प्रमुख विजय लुल्हे ,कवी मनोज भालेराव, प्रमोद पाटील,डॉ.संजय चव्हाण मान्यवर ग्रंथप्रेमी तथा वाचक उपस्थित होते.

वृक्षारोपणातून दिला पर्यावरण बांधिलकीचा नैतिक संदेश

गृहप्रवेशाच्या औचित्याने मानवसेवा मंडळ (खोटे नगर ) संस्थेचे चेअरमन डॉ . आर.एस.डाकलिया यांच्या हस्ते आंब्याचे रोप लावून आणि साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर व निवृत्त माध्यमिक उपाशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते वडाचे वृक्षारोपण करण्यात आले.त्याप्रसंगी सचिव विश्वनाथ जोशी,सहसचिव राजकुमार सेठीया,कोषाध्यक्ष घेवरचंद राका,सुनिल दाभाडे सर व सौ.दिक्षा दाभाडे, मुख्याध्यापिका माया अंबटकर ,मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, मुख्याध्यापिका मुक्ता पाटील,काकाश्री न्हानू दाभाडे,संदिप पवार ,राजेंद्र राणे,प्रमोद पाटील,राजेंद्र चव्हाण,प्रशांत पाटील,महेश वाघ,प्रमोद लोखंडे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजय पवार,सौ.कविता पवार,संदेश सोनवणे, सुकदेव मावळे, संदेश मावळे,अनिल चव्हाण,रमेश चव्हाण,किशोर चव्हाण,गिरीष जाधव,चित्रकार प्रेमकुमार सपकाळे,विजय लुल्हे,मनोज भालेराव सर,जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले, विजय चव्हाण यांनी अमूल्य सहकार्य केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button