Nilanga

डॉ अशोक नारनवरे यांना दुसऱ्यांदा पीएचडी पदवी प्रदान..

डॉ अशोक नारनवरे यांना दुसऱ्यांदा पीएचडी पदवी प्रदान..

शिवाजी निरमाळे निलंगा

निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक अशोक नारनवरे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी मानव्यविद्याशाखांतर्गत मराठी विषयात पीएचडी पदवी प्रदान केली आहे .
डॉक्टर अशोक नारनवरे यांनी ‘केशव मेश्राम’ यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गंगाधर पानतावणे व संजय मून संचालक व प्रमुख आजीवन शिक्षण व विस्तार विभाग (डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता.यावेळी बहि:स्थ परीक्षक डॉक्टर शैलेंद्र लेंडे प्राध्यापक मराठी विभाग (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर), अध्यक्ष डॉ दासू वैद्य प्राध्यापक व प्रमुख मराठी भाषा व वागमय विभाग (डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद) हे होते.फेब्रुवारी २०२१ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी डॉ.अशोक नानवरे यांना पीएचडी पदवी प्रदान केली आहे.
यानिमित्त कवी, साहित्यिक, शिवव्याख्याते सतीश हानेगावे, शिक्षक पत्रकार शिवाजी निरमनाळे यांनी डाॅ.नारनवरे सरांची स्वगृही सदिच्छा भेट देऊन सरांच्या या कार्याचे हार्दिक अभिनंदन, सत्कार केला.
यावेळी सरांनी थोडक्यात शोधप्रबंधाविषयी माहिती दिली ती अशी की, केशव मेश्राम हे मराठी साहित्य विश्वात कविता कथा कादंबरी ललित गद्य समीक्षा व वैचारिक साहित्य इत्यादी साहित्य प्रकारात कसदार पणे लेखन केले आहे. त्यांनी तब्बल 42 पुस्तके लिहिलीत. डॉ. अशोक नारनवरे यांनी मेश्राम यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास करून मेश्राम यांच्या समग्र साहित्याची मर्मस्थळे स्पष्ट केलेली आहेत.डाॅ.नारनवरे सरांच्या रूम मध्ये पाहिल त्या दिशेला कपाट, टेबल, खिडकी सर्व बाजूंनी पुस्तके दिसून आली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणूकी प्रमाणे मानव हा अविरतपणे विद्यार्थीचं असतो. नवनवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी वयाची अट नसते याप्रमाणे डाॅक्टर नारनवरे सरांचे जीवन आहे.
डॉक्टर नारनवरे यांनी यापूर्वीच सन 2012 मध्ये शिक्षणशास्त्र विषय व विद्याशाखा अंतर्गत मराठवाड्यातील अध्यापक महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी याचा वैज्ञानिक दृष्टिकोन. एक चिकिस्तक अभ्यास या विषयावर प्राचार्य डॉ बाबासाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या शोधप्रबंधास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी पीएचडी पदवी प्रदान केलेली आहे.
दोन वेगवेगळ्या विद्याशाखा अंतर्गत दोन वेगवेगळ्या विषयावर दोनदा पीएचडी पदवी मिळवली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button