Faijpur

हिंदी भाषेला सर्वांनी विश्वभाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ ए डी गोस्वामी यांनी केले

हिंदी भाषेला सर्वांनी विश्वभाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ ए डी गोस्वामी यांनी केले

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

भुसावळ : हिंदी भाषेला वैश्विक भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले . हिंदी भाषेला सर्वांनी विश्व भाषेचा दर्जा मिळावा .यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ . ए.डी. गोस्वामी यांनी केले . येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु .ओं . नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागा तर्फे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते .यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.एम . व्ही . वायकोळे उपप्राचार्य डॉ . बी . एच . बऱ्हाटे , डॉ . एन ई. भंगाळे, डॉ . एस . व्ही . पाटील, आदी उपस्थित होते .यावेळी प्रा . डॉ. गोस्वामी म्हणाले फैजपुर च्या 1936 च्या पवित्र भूमीतील हिंदी भाषेला वैश्विक भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी परिश्रम घेतले . त्याच भूमीतून आज हिंदी दिवसासाठी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा . डॉ. कल्पना पाटील या आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या हे महाविद्यालयाचे भाग्य आहे .अज्ञानापासून ज्ञानापर्यंत येणारी हिंदी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फैजपूर येथील प्राध्यापक डॉ .कल्पना पाटील यांनी हिंदी भाषेचे महत्व व रोजगार या बद्दल उपयुक्त माहिती दिली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय हिंदी विभागातील प्रा . डॉ.मनोज पाटील यांनी करून दिला तर प्रा . डॉ . राजेंद्र तायडे यांनी आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button