Nashik

महाराष्ट्रातील संतपरंपरेचे सामाजिक योगदान अपरिमित – संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे

महाराष्ट्रातील संतपरंपरेचे सामाजिक योगदान अपरिमित
– संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे

सुनिल घुमरे नाशिक

मोहाडी : महाराष्ट्रातील संतपरंपरेचे सामाजिक योगदान अपरिमित आणि अपरंपार आहे.महाराष्ट्र विद्वत्तेचे माहेरघर आहे.सामाजिक समानतेचा पाया घालण्याचे काम संतांनी केले. ज्ञानेश्वरांनी या कार्याचा पाया तर तुकारामांनी कळस केला आणी याच संतांच्या अपरीमीत सामाजिक योगदानामुळे समाज सुधारकांना सुधारणेचा पाया घालणे सोपे गेले असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे
यांनी केले.
ते मोहाडी( ता. दिंडोरी) येथील श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्ताने अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन च्या वतीने आयोजित ६५ व्या ऑनलाइन व्याख्यानमालेत दुसरे पुष्प महाराष्ट्रातील संत परंपरा या विषयावर गुंफताना बोलत होते. डॉ. देखणे पुढे बोलताना म्हणाले की, संतांनी माणूस उभा करण्याचा प्रयत्न केला. आजही पंढरपूरच्या पांडुरंगाला आपले दुःख सांगायला वारकरी सगळे पाश सोडून पायी जायला निघतात. हा त्याग कुठून येतो तर तो संताच्या विचारातून येतो. त्याग, योग, प्रेम हे सर्व भाव सर्व दुःख विसरून माणसाला पंढरीच्या पांडुरंगात संतांनी पाहायला शिकविले. ही संत साहित्याची खरी परंपरा आहे.
संतांनी ज्ञानाला प्रेमाची आणि भक्तीची जोड दिली. पण ही भक्ती विधीमध्ये अडकली नाही. तर ती सर्वसामान्य माणसाच्या उत्थानात दडलेली आहे. आजची वारी खऱ्या अर्थाने एकात्मतेची दिंडी आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये.
कार्यक्रमास
कादवा कारखाना संचालक शहाजी सोमवंशी, साहित्यिक लक्ष्मण महाडिक, तळोदा येथील प्रा. सुधीर माळी, ज्योती देशमुख, प्राचार्य डॉ. पी व्ही रसाळ, माजी जि प गटनेते प्रविण जाधव,
दिंडोरी कृऊबा समितीच्या संचालीका वनिता देशमुख,सुरेश सोमवंशी,डॉ. युवराज पाटील,शशिकांत ढेपले सह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राध्यापक धनंजय देशमुख ,पाहुण्यांचा परिचय प्राचार्य विलास देशमुख तर आभार संजय डिंगोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुदर्शन जाधव, अमोल देशमुख, मनोज मोगरे, पवन जाधव, विवेक नेवकर यांनी प्रयत्न केले.

उद्याचे व्याख्यान (दि.२५) व्याख्याते- रामचंद्र देखणे (पुणे)
विषय -महाराष्ट्रातील लोक परंपरा

संबंधित लेख

Back to top button