sawada

शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी केंद्र अरण येथे शिक्षकांच्या निबंध स्पर्धा आयोजित शिक्षकांच्या ज्ञान वृध्दी साठी महत्वाच्या स्पर्धा.. केंद्रप्रमुख. डॉ.विलास काळे

शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी केंद्र अरण येथे शिक्षकांच्या निबंध स्पर्धा आयोजित शिक्षकांच्या ज्ञान वृध्दी साठी महत्वाच्या स्पर्धा.. केंद्रप्रमुख. डॉ.विलास काळे

सोलापूर : दि.२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर दिलीप स्वामी साहेब यांच्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांतर्गत आज महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्ताने दि. २/१०/२०२१ रोजी जिल्ह्यात सर्वत्र शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरण केंद्र अरण येथे केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे यांचे मार्गदर्शनाखाली अरण केंद्रातील सर्व शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ.विलास काळे, श्री. नवनाथ शिंदे यांनी परिश्रम घेतले.
शिक्षक स्पर्धेसाठी विषय ‘ माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी माझी जबाबदारी’ या विषयावर केंद्रातील ३९ शिक्षकांनी आपली मतं लिखाणाद्वारे व्यक्त केली. स्पर्धेचे नियोजन डॉ. विलास काळे व केंद्रीय मुख्याध्यापिका शांता वाघमोडे यांनी केले. कोरोनाचे सर्व नियम पाळून शिक्षकांनी अगदी विद्यार्थ्याप्रमाणे निबंध स्पर्धेसाठी उत्साह दाखवला. स्पर्धेला भेट देण्यासाठी कुर्डूवाडी येथील विषय शिक्षिका दिपाली माळी मॅडम उपस्थित होत्या. निबंध स्पर्धेचे वातावरण पाहून समाधान व्यक्त केले. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण व पर्यवेक्षण श्री. सोनवणे बी.ए, चव्हाण बी. एम., सरडे ए. बी., व इंगळे टी.आर. यांनी केले. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नवनाथ शिंदे विषय शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्होळे खुर्द , द्वितीय क्रमांक वंदना खुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवस्ती अरण व तृतीय क्रमांक संजय नाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळशी यांनी पटकावले. विजेत्या स्पर्धक शिक्षकांचे अभिनंदन मा. जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, शिवाजीराजे कांबळे , अॅड. विजय शिंदे, दिगंबर माळी, गशिअ. मारुती फडके, डॉ विलास काळे यांनी व केंद्रातील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button