Amalner

आपत्ती व्यवस्थापनला “इग्नोर” नका करू मॅडम..!आपत्ती व्यवस्थापन समितीच आपत्तीत..!आरुषीच्या मृत्यूने “सिमा”च्या आपत्तीतील “सीमा” झाल्या उघड..!

आपत्ती व्यवस्थापनला “इग्नोर” नका करू मॅडम..!आपत्ती व्यवस्थापन समितीच आपत्तीत..!आरुषीच्या मृत्यूने “सिमा”च्या आपत्तीतील “सीमा” झाल्या उघड..!

अमळनेर येथील नुकत्याच सात्री येथील 11 वर्षीय आदिवासी मुलीच्या मृत्यूने सर्वच सुन्न झाले आहेत. या अनुषंगाने मात्र आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अस्तित्वाचा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.जिल्हाधिकारी कार्यालय संचलित तालुका पातळीवर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत असते.पण अमळनेर तालुक्याच्या दुर्दैवाने ही समिती कोपऱ्यात धूळ खात पडली आहे.11 वर्षीय आरुषी च्या मृत्यूनंतर ह्या समिती चे सदस्य त्यांचे काम,त्यांचे साहित्य,अपडेट्स ह्या गोष्टी उपस्थित झाल्या आहेत. कारण आरुषी चा मृतदेह एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती कडे बोट उपलब्ध नव्हती,दुसरे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते विशेष म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समिती त असणाऱ्या एकालाही पोहता येत नव्हते.अमळनेर पोलीस दलातील तसेच अमळनेर न प प्रशासनातील आपत्ती व्यवस्थापन समिती त कोणालाही पोहता येत नाही ही धक्कादायक बाब सामोर आली आहे. याचाच अर्थ समितीतील सदस्य हे नाममात्र असून समिती देखील नाममात्र आहे.केवळ कागदावर ही समिती कार्यरत असल्याचे स्पष्ट पणे दिसून आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.प्राधिकरणाच्या अमळनेर तालुक्याचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी यांना दुसऱ्यांना इग्नोर करणे खूप आवडते त्यामुळे त्यांचा हा इग्नोर करण्याचा स्वभाव इथे त्यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती ला देखील इग्नोर केले आहे. ह्या दुर्लक्षित पणा मुळे आरुषीला तिच्याच आजारी नातेवाईकांना पाण्यात उतरून पोहत दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जावे लागले. ही बाब अत्यंत गंभीर असून उपविभागीय अधिकारी यांनी ह्या समितीला पुनर्जीवन द्यावे.समिती चे पुनर्वसन करावे अशी मागणी केली जात आहे. जोपर्यंत परिस्थिती निस्तारत नाही तोपर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे, हेच ही सर्व जबाबदार विभाग व अधिकारी विसरले आहेत.

एका मुलीचा जीव घेऊनही आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब होतांना दिसून येत नाही. आपत्ती व्यवस्थापन समिती ची काही कामे आपत्तीपूर्व काळात, आपत्तीच्या काळात आणि आपत्ती नंतरच्या काळात करावयाची असतात. यासाठी यंत्रणांचे समुपदेशनाची आवश्यकता वाटते आहे.त्यांनी जर सांगितले तर आपत्ती व्यवस्थापन चे धडे त्यांना दिले जाऊ शकतात.तेव्हढी यंत्रणा आमच्याकडेही उपलब्ध आहे.आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याकडे लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button