Ratnagiri

गोवारी जातीच्या लोकांना आदिवासींचे दाखले देऊ नका – बिरसा क्रांती दलाची मागणी..

गोवारी जातीच्या लोकांना आदिवासींचे दाखले देऊ नका – बिरसा क्रांती दलाची मागणी..

प्रतिनीधी : सुशिल पावरा

रत्नागिरी: गोवारी जातीच्या उमेदवारांना अनुसूचित जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत कोणत्याही गैर आदिवासींना आदिवासींचे दाखले देऊ नये,अशी मागणी बिरसा क्रांती दल कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी सह आयुक्त जात पडताळणी समिती अमरावती यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. गोवारी जातीच्या उमेदवाराला शिक्षण व शासकीय नोकरी करिता अनुसूचित जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र तातडीने देण्याचे निवेदन काही गोवारी समाजाच्या लोकप्रतिनिधींनी व संघटनांनी दिले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे परंतु हेतू पुरस्करपणे परिणय फुसे, प्रताप अडसूड व श्रीमती. यशोमती ठाकुर पालकमंञी अमरावती या लोकनेत्यांनी राजकीय स्वार्थ समोर ठेवून महाराष्ट्र राज्यातील गैरमार्गाने जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी दबाव तंञाचा वापर करीत आहेत. हे खरे आदिवासी समाजावर अन्याय करणारे आहे. गोवारी जातीचा व आदिवासी समाजाचा काहीही संबंध नाही .तसेच गोवारी जातीला महाराष्ट्र शासनाने एसबीसीमध्ये टाकून त्यांचा स्वतंञ संवर्ग निर्माण करून 2% आरक्षण व सवलती गोवारी समाजाला देत आहे. तरी श्रीमती यशोमती ठाकुर पालकमंञी अमरावती यांनी गोवारी समाजाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने नुकतेच सहाय्यक आयुक्त जात पडताळणी समिती अमरावती कार्यालयालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव आणत गोवारी उमेदवारांना आदिवासींचे दाखले देण्याबाबत धमकावले असल्याचा प्रकार घडला आहे. काही प्रकरण न्यायालयीन असल्यामुळे कोणाच्याही दबावाने गोवारी समाजाच्या लोकांना आदिवासींचे दाखले देण्यात येऊ नये. गोवारी जातीच्या उमेदवारांना अनुसूचित जमाती चे प्रमाणपत्र देणे, हे आदिवासी समाजावर अन्यायकारक होईल. म्हणून गोवारी जातीच्या उमेदवारांना आदिवासींचे दाखले देऊ नये, अशी मागणी बिरसा क्रांती दल संघटनेतर्फे सह आयुक्त जात पडताळणी समिती अमरावती यांच्या कडे करण्यात आलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button