Aurangabad

जिल्ह्यात कॉंग्रेसचा आमदार, खासदार नसला तरी निराश होऊ नका : ऊर्जामंत्री नितीन राऊत…

जिल्ह्यात कॉंग्रेसचा आमदार, खासदार नसला तरी निराश होऊ नका : ऊर्जामंत्री नितीन राऊत…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही एकटे नाहीत तर मी तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिली.

काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस विचारांचे बळकटीकरण केले पाहिजे असे म्हणत डॉ. राऊत यांनी औरंगाबाद येथील स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संजीवनी निर्माण केली. शहरातील गांधी भवन या काँग्रेस मुख्यालयास भेट दिली. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार कल्याण काळे,

माजी आमदार नारायण पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीनाताई शेळके, शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, महिला काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष सीमाताई थोरात उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button