Nandurbar

सत्ताधार्यांना कायद्या लागु होत नाही का ?

सत्ताधार्यांना कायद्या लागु होत नाही का ?

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : दिनांक 22 मई 2021 रोजी नंदुरबार येथे, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक जे मागील वर्षीही कोरोनाचा प्रकोप सुरू असतांना लॉकडाऊन मध्ये शाही ईत्मामात एका बड्या नेत्याच्या फार्म हाऊस वर आपल्या मुलाच्या रिसेप्शन पार्टी दिल्यामुळे खूप चर्चेत राहिले होते. त्या वेळेला मीडीया व राजकीय पक्षाचे लोकांनी त्या विषयाला खूप उचलुन धरला होता एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षने त्या वेळेला मा. जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देतांना त्यात या महाशयला पोलिस खात्याचा दलाल म्हणुन संबोधले होते ? त्यावेळेला पोलिसांना नाईलाजाने कार्रवाई करावी लागली होती, परंतु आजही अस वाटते की या महाशयांसाठी कायद्या कुठलाही महत्व ठेवत नाही ? की कायद्याचे रक्षकांनीच याला खुली सूट दिली आहे ?
कोरोना काळात एक गरीब मास्क विना भेटला की आज पर्यंत दर रोज पोलिस ठाण्यात विविध कलमांवय गुन्हे नोंद होत आहे. परंतु दिनांक 22-05-2021 रोजी जिल्ह्यात (37)(1)(3) लागु असतांना या महाशयांनी विना मास्क वाजंत्रीसह लहान मुलांना सोबत घेऊन रली काळली होती ज्याची वीडियो सहा तक्रार निवेदन मा. पोलिस निरीक्षक नंदुरबार शहर यांना देण्यात आला असुन सुमारे 20 दिवस लोटूनही आजपर्यंत कार्यवाहीस टाळाटाळ केली जात असल्याने एम आई एम जिल्हाध्यक्ष यांनी उद्या दिनांक 15-06-2021 मंगळवार पासून मा. पोलिस अधीक्षक कार्यालया समोर धरने आंदोलनास बसण्याचे निवेदन वजा स्मरणपत्र दिले आहे.
या सर्व घटनेत जनतेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की कायद्या फक्त गोर गरीबांसाठीच आहे का की या नगर सेवकवर ही कार्यवाही होणार?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button