Faijpur

वाचन, चिंतन, मनन यामुळे चांगले लेखन करता येते-प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे

घ. का. विद्यालय, अमोदा येथे निबंध स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी, विभाग प्रमुख, मुख्याध्यापक व मान्यवर

सलीम पिंजारी

फैजपूर
वाचन, चिंतन, मनन यामुळे चांगले लेखन करता येते-प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे

तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या मराठीविभाग आयोजित मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन घ. का. विद्यालय आमोदा येथे करण्यात आले. सदर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजीव बोठे सर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.मनोहर सुरवाडे यांनी मराठी भाषेचे महत्व प्रतिपादन करून निबंध लेखनाच्या स्पर्धेत कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष घालावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चांगले लेखन करता येणे ही एक कला आहे, ही कला जोपासण्यासाठी वाचन चिंतन व मनन याची गरज असते. सदर स्पर्धेमध्ये आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक -हेमल खुशाल महाजन, द्वितीय क्रमांक -भूमिका ललित पाटील, तृतीय क्रमांक- तनुजा बाळू सपकाळे व उत्तेजनार्थ पारितोषिके हेमांगी प्रमोद वाघुळदे व योगिता युवराज सरोदे यांनी यांनी प्राप्त केले. अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक श्री बोठे यांनी माय मराठीचे महत्व प्रतिपादन करून आपल्या मातृभाषेचे उच्चार भाषण अतिशय स्पष्ट असावेत, उच्चार अस्पष्ट असतील तर त्यामुळे होणाऱ्या गमतीजमती विद्यार्थ्यांसमोर मांडून मातृभाषेचा वापर अतिशय काळजीपूर्वक करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांसमोर केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले यांनी केले तर आभार डॉ.शरद बिऱ्हाडे यांनी मानले. सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री पी एन पाटील सर व दीपक बारी सर यांची विशेष उपस्थिती लाभली. सदर पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद मोठ्या संखेने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button