Erandol

एरंडोल येथे दिव्यांग सेनेची बैठक संपन्न

एरंडोल येथे दिव्यांग सेनेची बैठक संपन्न

रजनीकांत पाटील

प्रतिनिधी – एरंडोल येथे दिव्यांग सेनेच्या माध्यमातून भारत पाटील दिव्यांग सेना एरंडोल तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळेस दिव्यांग सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.कोरोना च्या काळामध्ये दिव्यांग बांधवांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही. म्हणून आज दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन सर आणि एरंडोल तालुकाध्यक्ष भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये केंद्र शासनाच्या अंत्योदय योजने विषयीची माहिती देण्यात आली. यावेळी अंत्योदय योजनेचा अर्ज देण्यात आला. तसेच त्यावेळी दिव्यांग बांधवांचा कल्याणकारी पाच टक्के निधीबाबत सुद्धा माहिती देण्यात आली. दिव्यांग बांधवांमध्ये जनजागृती आणि नवचैतन्य निर्माण होऊन त्यांचा आनंद द्विगुणित झाला.दिव्यांग बांधवांच्या समस्या यांच्यावरती मार्ग काढण्यात आले. त्यावेळेस एरंडोल तालुका अध्यक्ष भारत पाटील यांचे सुद्धा कौतुक करण्यात आले. ते दिव्यांग बांधवांना संघटित करून एकत्रित करण्याचे उत्कृष्ट प्रकारे कार्य करत आहे. यावेळेस वासुदेव वाघ दिव्यांग सेना धरणगाव तालुका अध्यक्ष, नंदलाल कुलथे धरणगाव शहराध्यक्ष, काशिनाथ महाजन मूकबधिर एरंडोल तालुका अध्यक्ष, दादामिया खान एरंडोल तालुका उपाध्यक्ष, अखिल टेलर एरंडोल तालुका सचिव, सामाजिक कार्यकर्ते सिताराम बऱ्हाटे, तसेच समस्त दिव्यांग बांधव आणि पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button