Buldhana

दिव्या फाऊंडेशन “समाजमानव” पुरस्काराने सन्मानित

दिव्या फाऊंडेशन “समाजमानव” पुरस्काराने सन्मानित

पुरस्कार स्वीकारताना अशोक काकडे सुनील तिजारे व मोरे

राजेश सोनुने

बुलडाणा : समाजाच्या उत्कर्षांसाठी नि:स्वार्थ भावनेने राज्यात कार्यरत असलेल्या दिव्या फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव करीत अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद (जाळीचा देव ) बुलडाणाच्यावतीने”समाजमानव” पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. ३० जानेवारीला अजिंठा रोडवरील श्री पंचकृष्ण मंदिर श्रीगोपाल आश्रम येथे लोणकर बाबा यांचे व मान्यवरांच्या हस्ते हा पूरस्कार दिव्या फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक काकडे व पदाधिकाऱ्यांनी स्विकारला. गेल्या अनेक वर्षापासून राज्यभरात दिव्या फाऊंडेशन विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करीत आहे.

दिव्या फाऊंडेशन &Quot;समाजमानव&Quot; पुरस्काराने सन्मानित

सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्यात संस्थेचा हिरीरिने सहभाग असतो. वंचीत व निराधांरासाठी आधारवड बनलेल्या दिव्या फाउंडेशनने आजवर केलेल्या सेवाभावी कामाचे मुल्यमापन करुन भविष्यात त्यांना अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांना अभा पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्या वतीने “समाजमानव” पूरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितित शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी राजेंद्र मोरे,सिद्धार्थ आराख, संगिता राजपूत,सुनील तिजारे,मंगेश ठाकरे, गजानन अवसरमोल मोहसीन खान,चंदूकुमार बहेकार,डॉ गौतम अंभोरे डॉ.निकम यादी दिव्या फाऊंडेशनचे सहकारी उपस्थित होते, दिव्या फाऊंडेशन च्या कार्याचा पाठीशी उभे असणाऱ्या सर्व पत्रकारांकडून सुद्धा शुभेच्छा मिळाल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button