Maharashtra

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाची जिल्हास्तरीय आढावा बैठक नाशकात संपन्न.

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाची जिल्हास्तरीय आढावा बैठक नाशकात संपन्न.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक ; महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ जिल्हा आढावा बैठक आज रोजी शिवनई दिंडोरी येथे मोठ्या उत्साह पुर्ण वातावरणात पार पडली या बैठकीस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सचिव यांना आमंत्रित केले होते प्रमुख अतिथी म्हणुन वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्याचे वारकरी अध्यक्ष हभप आरके रांजणे महाराज ,राज्य कार्याध्यक्ष हभप रामेश्वर शास्त्री महाराज, राज्य कोषाध्यक्ष हभप फुल सुंदर महाराज तसेच राज्य संघटक ह भ प काळोखे महाराज मंडळाचे प्रमुख ज्येष्ठ मार्गदर्शक आर्युवेदाचार्य हभप रघुनाथमहाराज, द्वाराचार्य ह भ प रामकृष्णदासजी महाराज लहवितकर मार्गदर्शक समिती प्रमुख हभप पंडित महाराज कोल्हे ,नाशिक जिल्हाध्यक्ष हभप श्रावण महाराज आहिरे जिल्हा उपाध्यक्ष हभप सुभाष महाराज जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे, ह भ प माधव महाराजशास्त्री तसेच राज्य व जिल्हयातील वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांनी या आढावा बैठकीस उपस्थित राहुन मार्गदर्शन केले . जिल्हा मार्गदर्शक हभप पंडित महाराज कोल्हे यांनी प्रमुख उपस्थितांची ओळख व आढावा बैठकीचा हेतु विशाद करतांना वारकरी संप्रदायातील किर्तनकारांनी किर्तनाच्या मानधनावरुन नियोजकांना वेठीस धरू नये व कोणत्याही स्वस्वार्थासाठी आपल्या सांप्रदायाचे नाव बदनाम होऊ देऊ नये असा संदेश आपल्या स्वागत पर भाषणातुन व्यक्त केला .संत वीर वै . रामदासबुवा मनसुक यांनी वारकऱ्यांना येणाऱ्या अनंत अडचणी सोडविण्याच्या हेतुने वारकऱ्यांच्या हितासाठी हे ऐकमेव वारकरी संघटन त्या काळी संघटीत केले या महामंडळाचा स्थापनेपासुन आजपर्यंत चा इतिहास द्वाराचार्य लहवीतकरांनी आपल्या भाषणातुन सादर केला ह्या महामंडळाच्या माध्यमातुन आजपर्यंत किती कामे झाली व पुढे कोणती कामे मार्गी लावायची आहेत प्रत्येक तालुकास्तरावर वारकरी भवन उभे करण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरवा केला जाईल याचा कार्याध्यक्ष रामेश्वर शास्त्री यांनी आपल्या भाषणातुन उहापोह केला . वारकरी महामंडळाचे कार्य हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसुन अनेक राज्यातुन हे कार्य उत्तम सुरू असल्याचे राज्याचे अध्यक्ष रांजणे साहेबांनी आपल्या भाषणातुन उपस्थितांना सांगितले शेवटीआपल्या अध्यक्षीय भाष नातुन अधिकारी वाणीने रघुनाथमहाराज देवबाप्पा यांनी कोणताही इतिहास व कोणतीही ध्येयधोरणे समोर नसतांना केवळ पदासाठी वारकरी संप्रदायाच्या ज्या नवनवीन संघटना जिल्हयात फोफावत आहेत त्यावर आपल्या घणाघाती भाषणातुन टिका केली .अशा संघटनेच्या नादी न लागता प्रत्येक वारकऱ्यांनी स्वयंशिस्त बाळगुण योग्य मार्गाने परिक्रमण करावे केवळ खुर्चीच्या मागे न लागता कार्यातुन आपला ठसा उमटावा असे सांगितले . या बैठकीचे शिस्तबद्ध असे नियोजन नासिक जिल्हा सचिव हभप लहू महाराज अहिरे हभप पांडूरंग महाराज गडकरी व समस्त गांवकरी मंडळी शिवनई यांनी अप्रतिम केले त्यांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानतांना नासिक जिल्ह्यात भव्य असा वारकरी संत साहित्य मेळावा लवकरच आयोजित केला जाईल असे प्रतिपादन . जिल्हाध्यक्ष हभप श्रावण महाराज अहिरे यांनी जाहीर केले . शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button