Pandharpur

ग्राम संवाद सरपंच संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारणी जाहीर….

ग्राम संवाद सरपंच संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारणी जाहीर….

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत असलेले ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य या सरपंच संघटनेची सोलापूर जिल्हा कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे उपाध्यक्ष प्रमोद भगत सचिव विशाल लांडगे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांच्या नेतृत्वाने व सहकार्याने तसेच जिल्हा अध्यक्ष सुनील राजमाने व प्रमोद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ग्राम संवाद सरपंच संघ हा महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व ग्रामपंचायत पर्यंत पोहोचला असून आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य यांना कोरोना परिस्थिती असल्याने ऑनलाइन झूम मिटींग द्वारे ग्रामपंचायत मध्ये योजना राबवणे करता येणाऱ्या अडचणी 15 वित्त आयोग विषयी तो खर्च करणे करता येणाऱ्या अडचणी गावाचा विकास आराखडा तयार करने ग्रामपंचायत चे उत्पन्न वाढवणे विकासात्मक योजना राबवणे नव बौद्ध व दलित वस्ती सुधार योजनेतून निधी प्राप्त करून घेणे याविषयी सतत ग्राम संवाद सरपंच संघाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण देऊन सर्वांना मार्गदर्शन व प्रबोधन केले जात आहे त्याचा लाभ अनेक सरपंच व उपसरपंच घेत आहेत तसेच गाव कोरोना मुक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी युवा सरपंच कोमल करपे यांचे नुकतीच अभिनंदन केले आहे त्यांचे आपल्या सरपंच संघा मध्ये अभिनंदन अशा कर्तुत्ववान महिला आपल्या सरपंच संघात असून त्यांच वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार आहे गाव कोरणा मुक्त करणे करता त्यांनी केलेल्या उपाय योजना ची अंमलबजावणी सरपंच उपसरपंच यांनी आपापल्या गावात मध्ये केल्यास नक्कीच गाव कोरोना मुक्त होण्यास मदत होईल सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी ग्राम संवाद सरपंच संघ चे कार्य महाराष्ट्र भर पोहचवून आपली संघटना मजबुत करण्याकरिता प्रयत्न करायचा आहे वेळोवेळी अडचण येईल तेथे वरिष्ठांचे मार्गदर्शन व सल्ल्या घेऊन एकजुटीने व एकसंघ होऊन कार्य करायचे आहे आपण सर्वजण एका परिवारा प्रमाणे संघटन वाढवण्याकरता प्रयत्न करायचा आहे अशी आशा व्यक्त करतो पुनश्च सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा असे मत ‘सतीश दादा’ यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button