मोठा वाघोदा

जि प शिक्षण विभाग जळगाव यांना चौकशीकामी मुहूर्त कधी मिळणार*?

मोठा वाघोदा प्रकाश विद्यालय विद्यार्थी मारहाण प्रकरणी दोषी शिक्षकांची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई होवुन न्याय मिळावा म्हणून तक्रार दार पालक राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व अनुसूचित जाती जमाती आयोग यांचे कडे तक्रार करणार
जि प शिक्षण विभाग जळगाव यांना चौकशीकामी मुहूर्त कधी मिळणार*?

मुबारक तडवी
प्रतिनिधी मोठा वाघोदा बु ता.रावेर जि.जळगांव
याच प्रकरणी मुक्ताईनगर डीवायएसपी यांना तक्रारदार यांनी दिलेल्या लेखी तक्रार अर्जावर कार्यवाही करण्याचे सावदा पोलिस स्टेशनला लेखी पत्राद्वारे आदेश दिलेले आहेत
तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी यांनी चौकशीकामी संबंधित शाळेत भेट दिली असता शाळेची सुट्टी झाल्याने तक्रारदार विद्यार्थी समक्ष हजर नसल्यामुळे चौकशी न करताच परत गेले असल्याचा खुलासा तक्रारदार पालक यांचेशी संपर्क करून भ्रमणध्वनीवरून दिल्यानंतर शिक्षण विभागाला चौकशी करिता कधी मुहूर्त मिळणार?
मोठा वाघोदा बु ता रावेर येथील प्रकाश विद्यालयातील विद्यार्थ्यांस सर्दी पडशाने बाधित मोहसीन मुबारक तडवी इ यत्ता9 वी चे वर्गातील विद्यार्थ्याला खोकलत व शिंकत असताना दिंनाक 21/9 रोजी शाळेतील मुख्याध्यापक बी.टी सपकाळे व शिक्षक एम.एम.पाटील या दोन्ही शिक्षकांनी कांहीं एक कारण न ऐकताच विद्यार्थ्यांला बुधिद्वेशने व व्देष भावनेने बेदम अमानुष मारहाण केली होती सदरील पीडित मुलाची रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात शरीरावरील व्रण व जखमांची वैदयकीय तपासणी करण्यात आली होती सदरील मारहाण ग्रस्त असलेल्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या बेदम अमानुष मारहाण प्रकरनी सावदा पोलिस स्टेशन म उपविभागीय पोलीस अधीक्षक मुक्ताईनगर , मा ,गटशिक्षणाधिकारी रावेर प स , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगांव यांचे कडे लेखी निवेदन दिलेले आहेत परंतु अद्यापही कांहीं एक कारवाई करण्यात आली नसुन दोन्ही दोषी शिक्षकांना शिक्षण विभाग व पोलिस प्रशासन पाठीशी का ? घालत आहे ? तसेच तक्रारदार हे आदिवासी तडवी भिल्ल जमातीचे असून त्यांच्या आपल्यावर झालेल्या अन्यायाचा विरुद्ध न्याय न मिळाल्यास व दोषींवर गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी तक्रारदार पालक यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगा भोपाळ यांचेकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आणि आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही मुबारक ऊर्फ राजू अली खा तडवी यांनी दिला आहे तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या कार्यवाही करण्याची लेखी पत्र वर सावदा पोलीस स्टेशन चे अधिकारी काय? कारवाई करतात? व जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग चौकशी करून काय कार्यवाही करते? याकडे विद्यार्थ्यांसह पालकाचे लक्ष लागून आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button