Aurangabad

आसेगाव येथील सरपंच पद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलं…

आसेगाव येथील सरपंच पद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलं…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील आसेगाव ग्रामपंचायत येथील सरंपच पद जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तत्कालीन निर्वाचन अधिकारी यांच्यावर नियमभंग केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

गंगापूर तालुक्यातील आसेगाव ग्रामपंचायतीची सरंपचपदाची जागा ही एससी महिला प्रवर्गासाठी राखीव होती. तत्कालीन निर्वाचन अधिकारी डी.जी.पगार होते. याठिकाणी सविता राजगुरु आणि गिरीजा बागूल या दोन सदस्या एससी महिला प्रवर्गातील सदस्या होत्या.

वास्तविक सविता राजगुरु यांचा मूळ प्रवर्ग हा एससी आहे. मात्र त्या खुल्या प्रवर्गातुन निवडून आल्या या कारणाने निर्वाचन अधिकारी पगार यांनी त्यांचे नामनिर्दैशन पत्र रद्द् केले. तसेच 8 फेब्रुवारी 2021 तारखेची विशेष सभा तहकुब करण्यात आली आणि फेब्रुवारीला सविता राजगुरु यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी दाद मागितली.

त्यावर उच्च न्यायालयाने सविता राजगुरु यांचे नामनिर्दैशन पत्र स्विकारण्यात यावे, असे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही पगार यांनी श्रीमती राजगुरु यांचे नामनिर्दैशन पत्र स्विकारले नाही. तसेच गिरीजा बागुल यांना बिनविरोध सरपंच घोषीत केले.

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने सदर निवडणूकीची प्रक्रिया अवैध ठरवली असून सदर ग्राम पंचायतीचे सरपंच रिक्त घोषीत केले आहे. तसेच तहसलिदार गंगापूर यांना सदर सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया नव्याने घेण्याचे आदेश दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button