Parola

पोलीस कर्मचारी यांचेकडून बाजारात स्वखर्चाने मास्क चे वाटप..

पोलीस कर्मचारी यांचेकडून बाजारात स्वखर्चाने मास्क चे वाटप..

कमलेश चौधरी पारोळा

पारोळा : पारोळा शहरात दिनांक ९ रोजी सकाळी ९-०० वाजेपासून पारोळा येथील बाजारपेठेत कोरोना काळात प्रशासनाच्या नियमानुसार बिना मास्क फिरणाऱ्यां विरुद्ध नगरपालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्या दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे यांच्याकडून स्वखर्चाने मास्क नसलेल्यांना मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी मोटरसायकलस्वार बिनामास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत होती, जेणेकरून नागरिकांनी मास्क शिवाय बाहेर फिरू नये,यावेळी नगरपालिका कर्मचारी- आकाश कंडारे, जितेंद्र चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल-सुनील साळुंखे, होमगार्ड -प्रभाकर पाटील, सचिन पाटील, छोटू महाजन आदी कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button