Jalgaon

पाळधी येथे भाऊसो गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयात सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती व गणवेश वाटप

पाळधी येथे भाऊसो गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयात सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती व गणवेश वाटप

रजनीकांत पाटील

भाऊसो गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालय पाळधी तालुका धरणगाव जिल्हा जळगाव. या शाळेत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती व विद्यार्थी गणवेश वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि प सदस्य प्रतापराव गुलाबराव जी पाटील तसेच नवनिर्वाचित धरणगाव तालुक्यातील गटशिक्षणअधिकारी माननीय अशोक बिऱ्हाडे साहेब व धरणगाव पंचायत समिती सभापती मा मुकुंद नन्नवरे यांची उपस्थिती होती.

सदरील कार्यक्रमांमध्ये धरणगाव तालुक्यातील नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी आदरणीय अशोक जी बिऱ्हाडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला तसेच मुकुंद नन्नवरे पंचायत समिती सभापती यांनाही सन्मानित करण्यात आले.
शाळेतील शिक्षक आर व्ही पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सरस्वती मातेचे पूजन सन्माननीय प्रमुख पाहुणे यांच्याहस्ते व तसेच सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री मुकुंद नन्नवरे पंचायत समिती सभापती यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री कंखरे यांनी केले व तसेच आदरणीय गटशिक्षणाधिकारी साहेब यांचे स्वागत शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री एस वाय पाटील यांनी केले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ड्रेस शिवून देण्याचे काम ज्या टेलर यांनी केले त्यांचे स्वागत करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री कंखरे सर यांनी आपल्या मनोगतात सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती त्यासंदर्भात पालकांना मार्गदर्शन करून शिष्यवृत्तीच्या संदर्भात शालेय विद्यार्थ्यांची शाळेत 80 टक्के उपस्थिती असणे गरजेचे असते असे सुचवले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व बँकेचे पासबुक या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असते ते विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना धन्य माहिती करून दिली तसेच शालेय परिसरामध्ये संस्थेकडून विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शालेय दप्तर शालेय गणवेश बूट यांचे तसेच लेखन साहित्य यांचे अगदी कोणतेही शुल्क न आकारता संस्था आपल्याकडून मोफत स्वरूपात पुरवीत असते. शालेय प्रगती साठी शाळेच्या नविन उपक्रम बाबत परिसरात कौतुक व्यक्त केले जात आहे.

मा. गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी शिष्यवृत्तीच्या संदर्भात व शिष्यवृत्ती चा फायदा शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे घ्यावा या स्वरूपाचे अनमोल असे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना चेकद्वारे शिष्यवृत्ती व गणवेश वाटप करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी श्री डी एस पाटील सर यांनी सन्मानित केलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक श्री एस एन चौधरी सर डी एस पाटील सर श्री एस वाय पाटील सर श्री के टी पाटील सर श्री आर व्ही पाटील सर श्री बि आर बाविस्कर सर श्री म के टी वाघोदे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री पाटील भाऊसाहेब श्री शांताराम मोरे व श्री गोकुळ ननवरे व तसेच सुनील बारेला या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button