sawada

सावद्यात नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर रुग्णांना फळ वाटप

सावद्यात नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर रुग्णांना फळ वाटप

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे स्व.सुमन बाबुराव चौधरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे शहरातील रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर घेण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की सावद्यात जवळ पास ८ वर्षापासून कार्यरत असलेली स्व.सुमन बाबुराव चौधरी बहुद्देशीय संस्थेमार्फत सावदा शहरातील सुश्रुत हॉस्पिटल, सुश्रुत एक्सिडेंट हॉस्पिटल तसेच स्वामी हॉस्पिटल या ३ रुग्णालयात जावून स्वतः संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी नवरात्रीच्या पावन पर्वावर बाळंत झालेल्या महिलांना तसेच इतर सर्व उपचार घेत असलेले रुग्णांना फळ वाटप वाटप केले व रुग्णांची विचारपूस केली. सदरील संस्थेने रुग्णांना फळ वाटपाचा घेतलेला कार्यक्रम दिसायला छोटेखाणी असला तरी याबाबत कल्पना केल्यास कडतील की, सदर कार्यक्रम अतिशय चांगला व इतरांना हेवा सुटेल असा होता. या प्रसंगी स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनीता वारके,आणि डॉ.अविनाश बऱ्हाटे,अस्थी रोग तज्ञ डॉ.उमेश पिंपळे यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.या वेळी स्व. सुमन बाबुराव चौधरी बहुउद्देशीय या संस्थेच्या अध्यक्षा सौ. सारिका चौधरी तसेच सचिव राजेश चौधरी उर्फ (राज सर) उपस्थित होते.या फळवाटप कार्यक्रमास अनमोल सहकार्य सावदा नगरपरिषदेचे कर निरीक्षक अनिल आहुजा यांचे लाभले त्याचप्रमाणे सावदा दुर्गा केबल नेटवर्कचे श्री किशोर परदेशी. व पत्रकार तथा प्रेशियस कॉम्प्युटर चे संचालक प्रदीप कुलकर्णी हे देखील उपस्थित होते. सदर संस्थेमार्फत रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रमाचा रुग्णालयातील डॉ.सुनिता वारके, डॉ.अविनाश बऱ्हाटे, व डॉ.उमेश पिंपळे सह येथील पेशंट व त्यांचे नातेवाईकांनी कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button