Pune

ट्रायबल फोरम मावळ च्या वतीने सहारा वृद्धाश्रमात फळे वाटप

ट्रायबल फोरम मावळ च्या वतीने सहारा वृद्धाश्रमात फळे वाटप

पुणे : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

आदिवासी नववर्ष व मकरसंक्रांत च्या निमित्ताने ट्रायबल फोरम मावळ यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात काम करण्या बरोबर च सामाजिक बांधिलकी म्हणून कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व समाज बांधव यांनी भेट दिली व त्यांची विचारपूस करून तिळगूळ व फळे वाटप करण्यात आले.
ट्रायबल फोरम पुणे युवक जिल्हाध्यक्ष विक्रमशेठ हेमाडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेल मावळ तालुका यांच्या वतीने व मा. मारुती खामकर गुरुजी सरपंच किवळे कशाळ विभागीय उपाध्यक्ष पुणे जिल्हा ट्रायबल फोरम यांच्या मार्गदर्शनाखाली व दशरथ पिचड महाराष्ट्र पोलीस यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .
या वेळी गुलाब गभाले माजी आदर्श सरपंच वडेश्वर उपाध्यक्ष ट्रायबल फोरम पुणे जिल्हा, पप्पूशेठ वाजे महासचिव ट्रायबल फोरम मावळ, उमाकांत मदगे जिल्हा प्रतिनिधी, नाथा चिमटे माजी सरपंच कुसवली, बाळासाहेब दाते सरपंच कुसवली, मंगेश चिमटे पोलिस पाटील कुसवली, हिरामण हेमाडे, मधुकर कोकाटे प्रसिद्धी, बजरंग लोहकरे सर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित भेट देण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button