Pune

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते ५० टक्के सवलतीमध्ये पिठाच्या गिरणीचे वाटप

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते ५० टक्के सवलतीमध्ये पिठाच्या गिरणीचे वाटप

दत्ता पारेकर पुणे

पुणे : राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बेलवाडी वीज बिल भरणा केंद्र व संस्थेच्या वतीने ५० टक्के सवलतीमध्ये पिठाच्या गिरणीचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बेलवाडी येथील संस्थेने तसेच शरद जामदार आणि सहकाऱ्यांनी घेतलेला उपक्रम स्तुत्य आणि लोकउपयोगी असल्याची प्रतिक्रिया यावेळी राजवर्धन पाटील यांनी दिली.
सर्वसामान्य व्यक्ती विकासाला महत्व देऊन हर्षवर्धन पाटील यांनी कार्य केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सवलतीमध्ये पिठाच्या गिरणी नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती शरद जामदार यांनी दिली.
बेलवाडी गावातील ग्रामस्थांनी यावेळी आयोजकांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button