Aurangabad

सवलतीच्या दरात खतांचे वाटप

सवलतीच्या दरात खतांचे वाटप

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या हस्ते व नाबार्ड अंतर्गत नोंदणीकृत कोनेवाडी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. च्या वतीने सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खतांचे वाटप करण्यात आले.

औरंगाबाद-जालना महामार्गावर हसनाबादवाडी येथील कोनेवाडी फार्मर्स प्रोड्यूसर कं.लि.ला निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी भेट दिली.

यानिमित्त शेतक-यांसोबत संवादही साधला. दरम्यान नाबार्ड अंतर्गत नोंदणीकृत व महाराष्ट्र सहकार विकास महामंडल पुरस्कृत कोनेवाडी फार्मर्स प्रोड्युसर कं.लि. चे जवळपास 300 शेतकरी सभासद असून त्यांना सवलतीच्या दरात खते वाटपाचे उद्‌घाटन निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या हस्ते करण्यात आले.

एम.सी.डी.सी.चे व्यवस्थापक डी.डी.कुलकर्णी यांनी एम.सी.डी.सी.तर्फे देण्यात येणाऱ्या सर्व प्रकाराच्या रासायनिक खतांच्या सवलतीच्या दरामुळे होणाऱ्या आर्थिक फायद्याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास बाळासाहेब निकम, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी करमाड मंडळ, कृषी सहायक गणेश देवळे, कृषी सहायक कृष्णा गट्टुवार कंपनी चे संचालक नानासाहेब कोलते, भगवान शिंदे, कंपनीच्या सी.ई.ओ. कुमारी ऋतुजा महाजन सभासद शिव शर्मा भेरे, साहेबराव अंतराये, आत्माराम शिंदे, विजय म्हेत्रे, भिमराव शिंदे व इतर शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button