Pandharpur

आ. समाधान दादा आवताडे कडून गोरगरीब नागरिकांना फराळ वाटप

आ. समाधान दादा आवताडे कडून गोरगरीब नागरिकांना फराळ वाटप

प्रतिनिधी
रफिक आत्तार

पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी या पंढरपूरचे नेतृत्व मिळाल्यापासून या पहिल्याच असलेल्या दिपावलीनिमित्त खास फराळ आणि शुभेच्यापत्रही पंढरपूरच्या मतदारांना देऊन लोकाभिमुख ठरलेल्या आ. भारतानाना भालके यांची परंपरा चालविली आहे. त्यामुळे अनेक गोरगरिबांना या ऐन महागाईच्या काळात आधार मिळाला आहे.
आ. आवताडे यांनी या मतदार संघात निवडणूक लढवीत असताना केवळ एक विकास कामाचा ध्यास असलेले हे नेतृत्व आहे, हीच जाणीव मनात ठेवून पंढरपूरच्या मतदारांनी मतदान केले होते. मतमोजणीच्या दिवशीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आ. आवताडे यांना येथील जनतेसमोर समस्या जाणून घेण्यासाठी जाणे कठीण होऊन बसले होते.
मागील काही दिवसात थोडे वातावरण निवळले असून आता जनतेचेही काहीतरी देणे लागतो ही भूमिका स्वीकारत त्यांनी या पहिल्याच दिपावलीसाठी आपले शुभेच्छापत्र आणि सोबत फराळ देऊन घरोघरी इथून पुढील कालावधीत आपण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून टाकले आहे.आ. समाधान आवताडे हे पूर्वीपासूनच रस्ते ठेकेदारीच्या व्यवसायात आहेत. याबाबत येथील मतदार जाणून होते. त्यामुळे किमान आपल्या भागातील रस्ता तरी ते अडचणी पाहून करून देतील या आशेने पंढरीतील लोकांनी त्यांच्यावर एकदा विस्वास टाकून पहिला आहे. या विस्वासस पात्र राहण्यासाठी आता आ. आवताडे यांनी ज्या भागातील रस्त्याचा गंभीर प्रश्न आहे, या भागातील रस्ते व्यवस्थित करून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी पंढरीच्या अनेक भागातील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.पंढरपुर येथील अनेक भागातील नागरिकांनी केवळ रस्त्याच्या मुद्द्यावर नगरपालिकेत सत्तांतर घडवून आणले होते. परंतु रस्त्यावर साधा मुरूमही पडला नाही, सध्या सत्ताधारी असलेल्या नगरपालिकेतही अजूनही काही रस्त्यावर सध्याच्या परिस्थितीतही पाणी असून त्याचा डास वाढीस फायदा होत आहे. त्यामुळे अनेक भागातील लोकांचे आरोग्य धोक्याचे बनले आहे. आशा या आशादायी लोकांना किमान आ. समाधान आवताडे यांनी रस्ता करून घ्यावा हीच मागणी या दिपळीनिमित्त करण्यात येऊ लागली आहे.
आ भालके यांनीही अशाच प्रकारे लोकांच्या समोर जाऊन दीपावली साठी फराळ आणि शुभेच्छा पत्र देऊन आपली लोकप्रियता वाढवली होती, अगदी त्याचप्रकारे आ. समाधानदादा आवताडे यांनीही आपली यशस्वी कारकीर्द सुरू केली आहे. त्यामुळे पंढरपूर च्या नागरिकांतून आता आ .आवताडे यांच्याकडून अपेक्षा वाढू लागल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button