Pandharpur

डॉ .रमेश फाटे यांच्या वाढदिवसानिमित्त “पालवी ” मध्ये जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

डॉ .रमेश फाटे यांच्या वाढदिवसानिमित्त “पालवी ” मध्ये जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

प्रतिनिधी
रफिक आत्तार

पंढरपूरआज छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचे बंधू डॉ रमेश फाटे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘प्रभा-हिरा प्रतिष्ठान,पंढरपूर “पालवी”येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले .पालवीच्या संस्थापक सौ .मंगलताई शहा यांनी २० वर्षांपूर्वी केवळ प्रबोधन न करता समाजाची गरज म्हणून आणि उरातली तळमळ म्हणून २ बालकांना घेऊन पालवी हा संगोपन प्रकल्प आज १५० बालके आणि महिला वृद्ध ,दिव्यांग, मनोरुग्ण, स्त्री-पुरुष या सहित चालू आहे अशा संस्थेस थोडीशी मदत म्हणून छत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने डॉ .रमेश फाटे यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेश अध्यक्ष मा . श्री .नागेश फाटे,पालवी च्या संस्थापक सौ . मंगलताई शहा,सचिवा सौ .डिंपल घाडगे, उदयोग व व्यापार विभागाचे कल्याण कुसूमडे , डॉ . रमेश फाटे , संजय बागल , शांतीनाथ बागल , सतिस बागल , अतूल बागल, प्रताप टेलर , शुभम फाटे , शर्विन फाटे बापू रकटे , हणमंत पवार किशोर ससाणे आदि पदाधिकारी उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button