Amalner

खेडी बु. येथे जिप शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

खेडी बु. येथे जिप शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

अमळनेर:- तालुक्यातील खेडी बु. येथे जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य राकेश पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास वही व पेन भेट म्हणून दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष समाधान पाटील, ग्राप सदस्या उज्वला पाटील, तसेच ज्ञानेश्वर पाटील, पंडित पाटील, रोहिदास पाटील, यादव पाटील, दिलीप पाटील, सुदाम पाटील, सुभाष परदेशी, दिलीप परदेशी, गणेश पाटील, अजय बैसाणे, दिगंबर पाटील, पिरान भील गोकुळ पाटील, आदी उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी मुख्याध्यापिका भारती चौधरी, शिक्षक किरण मोहिते, अंगणवाडी सेविका शोभा पाटील व अलका पाटील यांचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Back to top button