Faijpur

नाहाटा महाविद्यालयातर्फे दत्तकखेडे महादेव माळ येथे कोरोनाविषयक जनजागृती व मास्कचे वाटप

नाहाटा महाविद्यालयातर्फे दत्तकखेडे महादेव माळ येथे कोरोनाविषयक जनजागृती व मास्कचे वाटप

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ, तसेच हिंदी, इतिहास व गणित, तत्वज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक खेडे महादेव माळ येथे सद्यस्थितीतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्यात आले. या अभियानाअंतर्गत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने बॅनरच्या माध्यमातून चित्रांद्वारे कोरोनाची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रदुर्भाव कसा टाळावा? त्यासाठी कोणती काळजी घ्यावी? याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच लसीकरणाबाबत जनजागरण करण्यात आले.
यावेळी प्राध्यापकांचे 4 गट तयार करून घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सभासदाला मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक कुटुंबाची कोरोनाकाळातील काळातील आर्थिक व सामाजिक परिस्थितवर आधारित प्रश्नावली भरून घेण्यात आली. गावातील श्री.ताराचंद गणपत जाधव यांच्याकडून महादेव माळ व बंजारा समाजाबद्दलची महिती घेण्यात आली.त्यात त्यांनी बंजारा समाजाचे सण उत्सव, रिती रिवाज याबद्दल सखोल माहिती दिली. यावेळी जि.प.शाळेचे मुख्याध्यपक मा.श्री.विजय पाटील, तसेच त्यांचे सहकारी शिक्षक श्री.निलेश पाटील सर, ग्रा.पं. सदस्य मा. सौ.लाछाबाई लक्ष्मण जाधव आणि मा. श्री. लक्ष्मण जाधव तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.ए.डी.गोस्वामी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सौ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डाॅ. एस.व्ही. पाटील ,डाॅ. बी.एच.ब-हाटे डाॅ. एन.ई.भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशासत्र विभागातील प्रा.एस.टी.धूम, प्रा.डाॅ.किरण वारके, प्रा. व्ही.ए.सोळुंके, प्रा.जितेंद्र आडोकार, प्रा. सौ.उज्ज्वला महाजन, गणित विभागाचे प्रा.आशिष नवघरे, इतिहास विभागातील प्रा.डाॅ.पी.एच.इंगोले, प्रा.डाॅ.दिपक शिरसाठ, हिंदी विभागाचे प्रा.डाॅ.मनोज पाटील, प्रा. डाॅ. राजेंद्र तायडे, तत्वज्ञान विभागाचे प्रा.डाॅ.सचिन राजपूत आदी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button