Nashik

महाराष्ट्र विधानसभाप्रभारी अध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संगणकीय सातबारा चा वाटप

महाराष्ट्र विधानसभाप्रभारी अध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संगणकीय सातबारा चा वाटप

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी तालुक्यात महसूल व वन विभाग यांचेकडे शासन निर्णयाप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अमृत वर्ष साजरे करताना शेतकऱ्यांना संगणीकृत डिजिटल स्वाक्षरी सातबारा प्राप्त होणे करता सातबाराची अद्यावत प्रत शेतकऱ्यांना मोफत देण्याची विशेष मोहीम आज 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी सुरूझाली या बाबत शासनाने निर्देश दिले या निर्णयाच्या अनुषंगाने आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील शेतकरी खातेदारांना माननीय नामदार श्री नरहरी झिरवाळ प्रभारी अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते संगणीकृत डिजिटल7/12देण्यात सुरुवात झाली प्राप्त होणाऱ्या सातबाराची आद्यवत प्रत मोफत वाटप करण्यात आले यावेळी दिंडोरी तालुक्यातील 32 गावांमध्ये विविध प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत एकूण 1977 संगणी कृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अद्यावत प्रतीचे शेतकरी सातबारे वाटप करण्यात आले सदरची मोहीम 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत सुरू असणार असून याबाबत श्री संदीप आहेर उपविभागीय अधिकारी दिंडोरी श्री पंकज कुमार पवार तहसीलदार दिंडोरी यांनी माहिती दिली तसेच प्राप्त झालेल्या संगणीकृत डिजिटल सातबारा प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या सातबाराची खात्री करून घ्यावी तसेच त्यात नावात क्षेत्र किंवा अन्य काही त्रुटी असल्यास असल्यास तात्काळ संबंधित फीडबॅक फॉर्म भरून आपले तलाठी यांचेकडे दुरुस्तीसाठी जमा करावा म्हणजेच आगामी काळात प्रस्तुत सातबारा बाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी व बिनचूक संगणीकृत डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा आपणास मिळेल यासाठी प्रशासनाच्या वतीने श्री डॉक्टर संदीप आहेर उपविभागीय अधिकारी दिंडोरी व श्री पंकज कुमार पवार तहसीलदार दिंडोरी यांनी डिजिटल सातबारा सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button