Champa

चांप्यात रेशनकार्ड नसलेल्यांनाही अन्नधान्य किट वाटप !’

चांप्यात रेशनकार्ड नसलेल्यांनाही अन्नधान्य किट वाटप !’

चांपा: अनिल पवार

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मजूर, कष्टकरी आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना बसला आहे.
केंद्र सरकारने आता ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. गेल्या २१ दिवसांच्या कालावधीत अनेकांना अन्नधान्य मिळाले नाही. दरम्यान, अनेक कामगार, मजूर आणि गरिबांकरिता मोफत धान्य देण्याबाबत राज्य सरकारने घोषणा केली. परंतु, त्यासाठी शिधापत्रिका अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु, अनेकांकडे शिधापत्रिका नाही. त्यांना धान्य मिळत नाही, अश्या लोकांना ‘शिक्षापत्रिका नसली तरीही आधार कार्डच्या आधारे धान्य देण्यात यावे, असे आदेश महसूल विभागाने दिले आहे.

चांप्यात रेशनकार्ड नसलेल्यांनाही अन्नधान्य किट वाटप !'

त्याच पार्श्वभूमीवर कोरोना संकटावर मात करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या परिस्थितीत घरी किमान दोन वेळेचं अन्न शिजवण्याकरिता देखील आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अनेकांचे घरगुती बजेट कोलमडल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे. अशा प्रकारे आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असलेल्या नागरिक बंधू भगिनींना माणुसकीचा हात देण्यासाठी 19 रेशनकार्ड नसलेल्या धारकांना उमरेड तालुक्यातील तहसीलदार प्रमोद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिधापत्रिका नसणाऱ्यांनाही पाच किलो तांदूळ , पाच किलो , गेहू , एक किलो सोयाबीन तेल, अर्धा किलो चहापत्ती , एक किलो साखर ,एक किलो चना व तुवळडाळ अशी अन्नधान्याची किट सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आली . यावेळी तलाठी प्रियंका अलोने उपसरपंच अर्चना सिरसाम , ग्रामसेवक बि बि वैद्य , ग्राम सदस्य सूरज माहूरे आदीसह उपस्थितांची कोरोना संसर्गा संबधित खबरदारी घेण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button