Amalner

मोहम्मद पैगंबर जयंती निमीत्त सुन्नी दावते इस्लामी तर्फे मोहम्मद पैगंबरांचे जिवन चरित्र पुस्तकाचे वाटप

मोहम्मद पैगंबर जयंती निमीत्त
सुन्नी दावते इस्लामी तर्फे मोहम्मद पैगंबरांचे जिवन चरित्र पुस्तकाचे वाटप

अमळनेर शहरप्रतिनिधी, येथील सुन्नी दावते इस्लामी तर्फे ईद निमित्ताने मोहम्मद पैगंबरांचे जिवन चरित्र रहमते आलम पुस्तकाचे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना केले वाटप.

जश्ने इदे मिलादुन नबी अर्थात मोहम्मद पैगंबर यांचा जन्म इस्लामी महिना रबिउल अव्वल च्या 12 तारखेला जन्म झाल्याने या दिवसाला इस्लामी जगात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हा दिवस मुस्लिम बांधवमोठा सण म्हणून आनंदाने साजरा करतात. या दिवसाला आपल्या घराला रोषणाई करून जेवणात गोड पदार्थ बनवून खातात.सकाळची नमाज पडून मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेल्या शिकवणी नुसार आपल्या परिसरातील अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जातात.त्यांना असलेल्या दुःखात सहभाग घेतात.ते दुःख दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात,मग तो व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो. इस्लाम धर्माचा पाया हा मानवतावादी असल्याने कोणतीही व्यक्ती उपाशी पोटी झोपणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मानवाच्या विकासाला व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अविरत काम करण्याचा सल्ला देणाऱ्या मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवसाचे ओचित्य साधून सुन्नी दावते इस्लामी तर्फे तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिंना मोहम्मद पैगंबर यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून त्यांच्या जीवन चरित्र पुस्तिका रहमते आलम भेट देण्यात आली.
सदर जीवन चरित्र आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, शिरीष चौधरी,राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शिवाजी पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,पाडळसरे धरण जन आंदोलन समिती चे अध्यक्ष सुभाष चौधरी, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख भागवत धनगर,सामाजिक कार्यकर्ते प्रा अशोक पवार,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष विजय गाढे, आदींना देण्यात आले.
सुन्नी दावते ईस्लामी शाखा अमलनेर यांच्या तर्फे सानेगुरुजी कन्या हायस्कूल व सानेगुरुजी नुतन माध्यमिक विध्यालय अमलनेर येथे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस प्रस्तावना सानेगुरुजी संस्था चे सचिव संदीप घोरपडे सर यांनी केले मुस्लीम युथ सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष रियाज़ शेख यांनी मोहम्मद पैगंबर जिवनावरील मनोगत व्यक्त केले.
सगीर भाई यांनी बेटी (मुलगी) रहमत आहे आणि आई चा पाया खाली स्वर्ग आहे असे मनोगत व्यक्त केले
सुत्रसंचालन मनिष उघडे सर यांनी केले मुख्याध्यापक श्रीमती अनिता पाटील यांनी आभार व्यक्त केले यावेळेस उपस्तीत साने गुरुजी संस्थापक चेअरमन हेमाकांत पाटील , संचालक शेख सर मुख्याध्यापक सुनील पाटील साहेब शिक्षक प्रतिनिधि विलास चौधरी साहेब मुस्लीम युथ सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष-रियाज़ शेख, फयाज भाई, सगीर भाई, इश्तियाक भाई, रज़्ज़ाक शेख आबिद अली, इरफान भाई मुस्तफा भाई, नूर पठाण आदि मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button