kalamb

आपली सई उपक्रमांतर्गत वाढदिवसानिमित्त हिटर वाटप

आपली सई उपक्रमांतर्गत वाढदिवसानिमित्त हिटर वाटप
सलमान मुल्ला कळंब
कळंब : कळंब येथील पत्रकार तथा नगरसेवक सतिश टोणगे यांची मुलगी कु.सई सतीश टोणगे हिच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुका पत्रकार संघ च्या आपली साई उपक्रमांतर्गत व दोस्ती ग्रुप च्या वतीने उप जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना वाफ घेण्याची मशिन्स, गरम पाण्याचे हिटर व दोस्ती ग्रुप चे कैज येथील मित्र विकास आप्पा मीरगणे यांच्या वतीने रुग्णालयात आल्हाद दायक वातावरण तयार व्हावे या साठी उदबत्ती बॉक्स वैद्यकीय अधिक्षक डॉ. जीवन वायदंडे यांच्या कडे देण्यात आले.
सई चा वाढ दिवस प्रतेक वर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो. यावेळी प्रा. संजय घुले, बाळकृष्ण भवर, रोटरी अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, रुग्ण कल्याण समितीचे हर्षद अंबुरे, भैयासाहेब बावीकर, चेतन कात्रे, शिवप्रसाद बियाणी, उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button