Pune

वनगळी ग्रामस्थांच्या वतीने बिनविरोध संचालक हिरालाल पारेकर यांचा नागरी सत्कार संपन्न ..

वनगळी ग्रामस्थांच्या वतीने बिनविरोध संचालक हिरालाल पारेकर यांचा नागरी सत्कार संपन्न ..

दत्ता पारेकर पुणे

पुणे : इंदापुर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी वनगळी गावचे बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिरालाल शंकर पारेकर यांची बिनविरोध संचालकपदी निवड झाल्याने वनगळी गावातील ग्रामस्थांनी उत्साहात हलगीच्या निनादात व फटाक्यांच्या आतषबाजीने हिरालाल पारेकर यांचा सत्कार केला.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच आप्पासाहेब जगदाळे व पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिरालाल पारेकर यांची निवड करण्यात आली आहे या निर्णयामुळे वनगळी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ..
यावेळी अण्णासाहेब बंडगर माणिक पाटिल पांडुरंग पारेकर धनाजी पारेकर शिवाजी करगळ अनिल पारेकर रेवण गव्हाणे बाबासाहेब पाटिल दादा निकम सुधीर पारेकर सुहास पारेकर दशरथ महादेव पारेकर एकनाथ पारेकर शंकर मारकड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button