Pune

मी एनडिए सोडणार नाही – माजी मंत्री महादेव जानकर

मी एनडिए सोडणार नाही – माजी मंत्री महादेव जानकर

दत्ता पारेकर पुणे

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तीन डिसेंबर रोजी त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आले.मात्र रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मतदारसंघातील साखर कारखान्यांसदर्भात मी पवारांना भेटलो होतो.याचा राजकारणाशी संबंध जोडू नये.भाजपने आमच्यावर जरी अन्याय केला असला तरी ही मी `एनडीए` सोडणार नसल्याचे सांगत महादेव जानकर यांनी या राजकिय चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते इंदापूर तालुक्यातील एका भेटी दरम्यान बोलत होते.

मी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जरुर भेटलो मात्र त्या भेटी मागे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मतदारसंघातील साखर कारखान्याचा बंद केलेला गाळप परवाना पुन्हा चालू करणे एवढाच हेतू होता. यापेक्षा वेगळी कोणतीही राजकिय चर्चा आमच्यात झाली नाही. सध्या महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला आमची गरज नाही कारण त्यांचे सरकार स्थिर आहे. व सरकार स्थापन केल्यानंतरचा एक वर्षाचा कार्यकाल देखील त्यांनी पूर्ण केला आहे. माझ्या पक्षाचा केवळ एक आमदार आहे.त्यामुळे मला सोबत घेण्याचा व मी जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे या पोकळ चर्चांना काहीही अर्थ नाही. भाजप ने आमच्यावर अन्याय केला आहे हे खरे आहे.माझा आमदार फोडला,लोकसभेची जागा सोडली नाही.परंतु आता ती वेळ नव्हे मला युती तोडायची असती तर ती मी विधानसभेतच तोडली असती.मात्र मी असले राजकारण कधी करत नाही. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे.आणि आम्ही त्यांचे घटकपक्ष असल्याने आम्ही संकटातही त्यांच्याच सोबत असू असे देखील जानकर यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button