Chandwad

किल्ले इंद्राई वरील प्राचीन इंद्रेश्वर महादेव मंदिरात दिपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

किल्ले इंद्राई वरील प्राचीन इंद्रेश्वर महादेव मंदिरात दिपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड येथिल दुर्गवीर किल्ले इंद्राई येथे परिसर कायमच निर्मनुष्य असतो. दिप-अमावास्येच्या निमित्तानं किल्ल्यावरील प्राचीन इंद्रेश्वर महादेव मंदिरात शिवपिंडीवर अभिषेक व महाआरती , दिप-पूजन करत दिपोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. चांदवड येथिल किल्ले इंद्राई हा दुर्गभ्रमंतीकारांचा आवडता किल्ला. या किल्ल्यावर प्राचीन इंद्रेश्वर महादेव मंदिरात पूर्वी परिसरातील लोक दिप-पूजनाचे दिवशी दिपोत्सव साजरा करायचे असे जुने लोक सांगत. नंतर हा परिसर निर्मनुष्य राहत असल्याने व अमावास्ये विषयी लोकांमध्ये एक भिती असल्याने. या मंदिरात दिपोत्सव साजरा होणे बंदच होते. म्हणुन करता नव्या पिढीला आपली सनातन परंपरा कळावी या उद्देशाने दिपोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी . प्रकाश सुर्यवंशी , प्रशांत सुताने सर , प्रा. उदय वायकोळे , साई सुर्यवंशी , वेदांगी सुर्यवंशी , प्रफुल्ल सोनवणे सर , हर्षाली सुर्यवंशी , भक्ती सुर्यवंशी , संतोष सोनवणे , बाळा पाडवी , समिर सुताने , विश्वजीत सोनवणे , सुमती सोनवणे , रेवती सोनवणे , मानस कोल्हार , अंतरा खैरनार…आदी शिवभक्त यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button