Pandharpur

फॅबटेकच्या दिपाली लेंडवे या विद्यार्थिनीची नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया या कंपनीमध्ये निवड

फॅबटेकच्या दिपाली लेंडवे या विद्यार्थिनीची नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया या कंपनीमध्ये निवड

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सांगोला: कॅम्पस प्लेसमेंट बाबतीत अग्रेसर असणाऱ्या फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागातील दिपाली लेंडवे या विद्यार्थिनीची नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असून तिला वार्षिक 4.5 लाख रुपयाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ रवींद्र शेंडगे यांनी दिली.नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही शेअर मार्केट डेरीवेटिव मधील जागतिक स्तरावर एक नंबर आणि इक्विटी मध्ये 4 नंबर क्रमांकावर आहे , त्यामुळे अशा नामांकित कंपनीमध्ये फॅबटेक कॉलेज मधील विद्यार्थ्यांना संधी मिळणे हे फॅबटेक मधील तंत्र शिक्षणाची गुणवत्ता दर्शवते असे संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रूपनर यांनी सांगितले. निवड झालेल्या या विद्यार्थ्याचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार, अकॅडेमिक डीन प्रा . तात्यासाहेब जगताप, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेली कम्युनिकेशनच्या विभागप्रमुख प्राध्यपिका धनश्री राऊत, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ .साहेबागौडा संगनगौडर, सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button