Mumbai

?आताची मोठी बातमी.. भारतीय क्रिकेटर सुरेश रैनाला मुंबईत अटक..!

?आताची मोठी बातमी.. भारतीय क्रिकेटर सुरेश रैनाला मुंबईत अटक

मुंबई भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैना आणि गायक गुरु रांधवा यांना मुंबईत अटक करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच समोर येत आहे. मुंबई विमानतळाजवळील मुंबई ड्रॅगनफ्लाय क्लबवर छापा टाकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते. तसेच त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार या छापा टाकल्यानंतर एकूण ३४ जणांना अटक करण्यात आली. यात ७ क्लबच्या स्टाफ सदस्यांचाही समावेश आहे. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहार पोलीस स्टेशनचे सिनीयर पीआय म्हणाले, गुरु रंधावा व क्रिकेटर सुरेश रैना हे त्या लोकांमध्ये आहेत, ज्यांना आम्ही ताब्यात घेतले होते.
त्यांनी काही नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांना नंतर बेलवर सोडण्यात आले आहे.
मुंबई पोलीसांनी सुरेश रैनासह ३४ जणांना आयपीसीच्या सेक्शन १८८, २६८ व ३४ खाली ताब्यात घेण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button