Nashik

दिंडोरी तालुका महाराष्ट्र राज्य गांवकामगार पोलीस पाटील संघाचा पोलीस पाटील स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

दिंडोरी तालुका महाराष्ट्र राज्य गांवकामगार पोलीस पाटील संघाचा पोलीस पाटील स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : पोलीस पाटील स्नेहमेळावा वणी सापुतारा रोडवरील श्रीहरी रेस्टॉरंट येथे संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण पाटील बोडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला,मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष चिंतामण मोरे पाटील हे होते,याप्रसंगी जिल्हा पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील यांना पोलीस पाटील कार्य व अधिकार तसेच महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम,याबाबत तसेच पोलीस पाटील यांनी कोणती महिती दयावी व तसेच मनात कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता काम करावे तसेच काम करत असतांना निपक्षपणे आणि सात्विक वृत्तीने काम करावे असे अरुण बोडके पाटील यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष चिंतामण मोरे पाटील यांनी मार्गदर्शन करतांना तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना संघटनेचे महत्व पटवून देतांना जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच पोलीस पाटलांच्या समस्या जाणून घेवून त्यावर योग्य मार्गदर्शन केले.त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य गांवकामगार पोलीस पाटील संघाच्या राज्य पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी यांना संघाच्या कामात मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी-पेठ विधानसभेचे लोकप्रिय आमदार नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभते याचा मोरे पाटील यांनी विशेष नामोल्लेख केला आणि याप्रसंगी झिरवाळ साहेबांचे आभार मानले.
जिल्हा उपाध्यक्ष संपत पाटील जाधव यांनी तालुक्यातील पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले.
आजच्या या मेळाव्याकरिता श्रीहरी रेस्टॉरंटचे संचालक आणि प्रगतिशील शेतकरी सन्माननीय संजय आप्पा पडोळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
आज तालुक्यातील उपस्थित पोलीस पाटील यांनी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे सभासदत्व स्वीकारले.तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील मुळाणे यांनी आलेल्या सर्व जिल्हा पदाधिकारी,तालुकाध्यक्ष आणि तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू आणि भगिणींचे आभार मानले.
सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष मुळाणे पाटील केले. या कार्यक्रमास जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पाटील सांगळे,जिल्हा महिला प्रतिनिधी सुनिताताई बोडके,सिन्नर तालुका अध्यक्ष मुकेश कापडी,माजी उपाध्यक्ष शिवाजी खराटे पाटील,चांदगिरीचे पोलीस पाटील लखन कटाळे दिंडोरी तालुका पोलीस पाटील संघाचे सर्व पदाधिकारी आणि तालुक्यातील सर्व पोलीस पाटील हजर होते.
मेळावा यशस्वी करण्यासाठी दिंडोरी तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष सोमनाथ पाटील मुळाणे,उपाध्यक्ष संजय पाटील धात्रक,तालुका सचिव वामनराव पाटील,सहसचिव राजेंद्र महाले पाटील,तळेगांव दिं.गांवचे पोलीस पाटील रोशन परदेशी पाटील,ढकांबे गांवचे पोलीस पाटील निलेश बोडके पाटील,दहेगावचे पोलीस पाटील संदिप हिरे पाटील आदी पाटलांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button