Nashik

दिलीप व्यवहारे यांचासेवापूर्ती समारंभ संपन्न

दिलीप व्यवहारे यांचासेवापूर्ती समारंभ संपन्न

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेच्या बी के कावळे व कनिष्ठ महाविद्यालय राजाराम नगर येथे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दिलीप रघुनाथ व्यवहारे 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती समारंभ विद्यालयात साध्या पद्धतीने विद्यालय स्तरावर संपन्न झाला यावेळी प्राचार्य बीके शेवाळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री दिलीप व्यवहारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख बाळासाहेब वडजे प्राचार्य शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले सत्काराला उत्तर देताना श्री व्यवहारे यांनी आपण शिक्षक म्हणून सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सतत न्याय देत आलो जीवन हे अस्थिर असून स्थिर करण्यासाठी नेहमी सहकार्याच्या भावनेने वागण्याची गरज आहे असेही मनोगत व्यक्त केले यावेळी परिवेक्षक विलास शिंदे ज्येष्ठ क्लर्क दत्तात्रय लोंढे याबरोबरच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षिका उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश सलादे यांनी केले तर आभार विकास गावडे यांनी मानले यावेळी अनेक शिक्षक शिक्षिका यांनी श्री दिलीप व्यवहारे यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button