Pandharpur

एनआयआरएफ’मध्ये क.भा. पाटील महाविद्यालय देशात ६७ वे तर महाराष्ट्रात १९ व्या स्थानावर

एनआयआरएफ’मध्ये क.भा. पाटील महाविद्यालय देशात ६७ वे तर महाराष्ट्रात १९ व्या स्थानावर

रफिक आतार

पंढरपूर – ‘नवी दिल्ली येथील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच जाहिर केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्वायत्त महाविद्यालयासाठीच्या ‘एनआयआरएफ’२०१९ च्या यादीमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा समावेश झाला असून देश पातळीवर ६७ वा क्रमांक संपादन केला आहे. तर राज्य पातळीवर १९ व्या स्थानावर हक्क बजावला आहे. ही बाब महाविद्यालयाच्या दृष्टीने अतिशय गौरवपूर्ण आहे.’ अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी दिली आहे.

पुढे बोलताना डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, ‘एचआरडी मिनिस्ट्री महाविद्यालयातील अध्ययन, अध्यापन, संशोधनासह प्राध्यापकांची क्षमता, कर्मचारी कल्याण व विकास विभाग, अभ्यासक्रमांची निर्मिती, प्लेसमेंट, पायाभुत आणि इतर गुणवत्तापूर्ण सुविधा व नेतृत्त्वाची गुणवत्ता या निकषांवर ही यादी तयार करते. या निकषांसाठीच्या ७०० पैकी ४८२ गुण मिळवून महाविद्यालयाने देश पातळीवर ६७ वे तर महाराष्ट्र पातळीवर १९ वे स्थान मिळविले आहे. या यादीत रयत शिक्षण संस्थेच्या इतर चार महाविद्यालयांचाही समावेश झाला आहे. ही बाब रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदली जाईल.

जून २०१९-२० पासून महाविद्यालयास स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाने शै. वर्ष २०१९-२० या वर्षापासून अनेक बदल केले आहेत. यामध्ये कालानुरुप आवश्यक असलेल्या बाबींचा समावेश अभ्यासक्रमात केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांमधील कौशल्ये निर्माण व्हावीत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. स्वायत्त महाविद्यालय अंतर्गत आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. या सर्व सुविधांचा उपयोग विद्यार्थी केंद्रीत शिक्षणावर होत आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केल्याबरोबर विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी यासाठी ‘प्लेसमेंट सेल’ची स्थापना केली आहे. अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय व उद्योजकात्मक फायदे व्हावेत यासाठी महाविद्यालय विशेष प्रयत्न करत आहे. तसेच विद्यार्थ्यांनी लघूउद्योग उभा करावेत. यासाठी त्यांना लघूउद्योगांचे ज्ञान, माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयात ‘इनक्युबेशन सेंटर’ची निर्मिती करण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या विकासासाठी प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, उपप्राचार्य बजरंग रोंगे, उपप्राचार्य अशोक चंदनशीवे, उपप्राचार्य व अधिष्ठाता डॉ. निंबराज तंटक, अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुरेश पाटील, अधिष्ठाता डॉ. सुखदेव शिंदे, डॉ. मधूकर जडल, डॉ. अमर कांबळे, डॉ. बजरंग शितोळे, सिनिअर विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरदचंद्रजी पवार, उपाध्यक्ष भाई गणपतराव देशमुख, चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव प्रिं. डॉ. भाऊसाहेब कराळे, मध्यविभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील, सहसचिव प्रिं. डॉ. विजयसिंह सावंत, महाविद्यालय विकास समितीमधील सदस्य आदी मान्यवरांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button